ATM मधून फाटलेली नोट बाहेर आली तर काय कराल?

| Updated on: Aug 26, 2021 | 10:45 AM

ATM Notes | फाटलेली नोट बदलण्यासाठी तुम्हाला एटीएमशी संबंधित बँकेत एक अर्ज द्यावा लागेल. त्यामध्ये पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचा पत्ता नमूद करावा लागेल. यासोबत पैसे काढल्यानंतर एटीएममधून येणारी रिसीटही तुम्हाला जोडावी लागेल.

ATM मधून फाटलेली नोट बाहेर आली तर काय कराल?
फाटलेली नोट बदलण्यासाठी तुम्हाला एटीएमशी संबंधित बँकेत एक अर्ज द्यावा लागेल. त्यामध्ये पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचा पत्ता नमूद करावा लागेल. यासोबत पैसे काढल्यानंतर एटीएममधून येणारी रिसीटही तुम्हाला जोडावी लागेल.
Follow us on

मुंबई: अलीकडच्या काळात लोक बँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएममधून पैसे काढण्याला प्रधान्य देतात. शहरी भागात अगदी प्रत्येक नाक्यावर एटीएम असल्यामुळे कधीही गरज लागल्यास एटीएममध्ये जाऊन पैसे काढता येतात. मात्र, कधीकधी एटीएममधून पैसे काढताना तुमच्या वाट्याला एखादी फाटलेली नोट येऊ शकते. अशावेळी फार बैचेन होण्याचे कारण नाही. तुम्ही अगदी सोप्या प्रक्रियेद्वारे फाटलेली नोट बदलून घेऊ शकता. कोणतीही बँक तुम्हाला फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.

फाटलेली नोट बदलण्यासाठी तुम्हाला एटीएमशी संबंधित बँकेत एक अर्ज द्यावा लागेल. त्यामध्ये पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचा पत्ता नमूद करावा लागेल. यासोबत पैसे काढल्यानंतर एटीएममधून येणारी रिसीटही तुम्हाला जोडावी लागेल. स्लीप जनरेट झाली नसेल तर तुम्हाला मोबाईलवर आलेल्या मेसेजची प्रिंटही देता येईल. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कोणतीही बँक फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.

बँकांची काय भूमिका?

मध्यंतरी एका स्टेट बँकेच्या ग्राहकाने ट्विटरवर अशीच तक्रार केली होती. त्या ट्विटला स्टेट बँकेकडून उत्तर देण्यात आले होते. यामध्ये म्हटले होते की, आम्ही एटीएममध्ये पैसे लोड करण्यापूर्वी प्रत्येक नोटेची अत्याधुनिक सॉर्टिंग मशिनद्वारे तपासणी करतो. त्यामुळे स्टेट बँकेच्या एटीएममधून खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा बाहेर येणे अशक्य आहे. तरीही तुम्ही एसबीआयच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधून नोट बदलून घेऊ शकता.

स्टेट बँकेत कशी तक्रार कराल?

तुम्हाला एसबीआयच्या एटीएममध्ये फाटलेली नोट सापडली तर तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या लिंकवर क्लिक करुन तक्रार नोंदवू शकता. बँका फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. तसे घडल्यास आणि कायदेशीवर वाद उद्भवल्यास बँकांना 10 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागू शकते.

संबंधित बातम्या:

आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?

तुमचं आधार कार्ड बनावट आहे का? एका मिनिटात तपासून पाहा

यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या घटली! काय आहे कारण?