Axis Bank : केंद्र सरकारचा एकच निर्णय, झटपट घसरले Axis बँकेचे शेअर

Axis Bank : अॅक्सिस बँकेविषयी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेच्या शेअरवर मोठा परिणाम झाला आहे.

Axis Bank : केंद्र सरकारचा एकच निर्णय, झटपट घसरले Axis बँकेचे शेअर
Axis चा शेअर घसरलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 4:21 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील बँक अॅक्सिसमधून (Axis Bank) बाहेर पडणार आहे. त्यासाठी सरकारने संपूर्ण तयारी केली आहे. केंद्र सरकार (Central Government) या बँकेतून त्यांची 1.55 टक्क्यांचा हिस्सा म्हणजे 4.65 कोटींचे शेअर विक्री करणार आहे. त्याचा परिणाम आज बाजारात या शेअरवर (Share) दिसून आला. हा शेअर बाजारात 3 टक्के घसरला.

अॅक्सिसमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाची शेअर बाजार आणि नियामक आयोग सेबीला माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारची एजन्सी, स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ द यूनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची (SUUTI) या बँकेत 1.55 टक्के हिस्सेदारी होती.

केंद्र सरकार अॅक्सिस बँकेतून संपूर्णपणे बाहेर पडत आहे. बँकेतील संपूर्ण हिस्सेदारी केंद्र सरकार काढून घेणार आहे. या निर्णयाचे पडसाद लागलीच या शेअरवर दिसून आले. शेअर झटपट घसरला.

हे सुद्धा वाचा

5 सप्टेंबर 2022 पर्यंत सरकारकडे अॅक्सिस बँकेची 1.55 टक्के हिस्सेदारी होती. सरकारकडील 4,65,34,903 शेअरची विक्री करुन 4,000 कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी अॅक्सिस बँकेचे शेअर 3.3 टक्क्यांनी घसरले.

बुधवारी अॅक्सिस बँकेचे शेअर 0.17 टक्क्यांच्या वृद्धिसह 874.35 रुपयांवर बंद झाले. केंद्र सरकारने यापूर्वी गेल्या वर्षी बँकेतील 1.95 टक्के हिस्सा विक्री केला होता. त्यातून 4,000 कोटी रुपये सरकारने जमविले होते. आताच्या निर्णयानंतर अॅक्सिस बँकेत सरकारचा एकही शेअर नसेल.

सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी अॅक्सिसचा शेअर घसरुन 845.15 रुपयांवर बंद झाला. NSE वर हा शेअर 3.23 टक्के घसरला. अॅक्सिस भारतातील तिसरी सर्वात मोठी खासगी बँक आहे. या बँकेने गेल्या महिन्यांत गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

2022 या वर्षात अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. या विक्रीतून सरकार चांगला नफा कमावत आहे. सरकारी कंपन्यांच्या विक्रीची पण योजना सरकारसमोर आहे. त्यामाध्यमातून सरकार मोठा निधी उभारणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.