Loan : कर्ज थकल्यास बँक नाही लावू शकत तगादा, कर्जदाराला मिळाले आता हे अधिकार..

Loan : कर्ज थकल्यास आता बँकेला नाही करता येणार जबरदस्ती, काय आहेत तुमचे अधिकार..जाणून तर घ्या..

Loan : कर्ज थकल्यास बँक नाही लावू शकत तगादा, कर्जदाराला मिळाले आता हे अधिकार..
वसुलीसाठी नाही देता येणार त्रासImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 8:47 PM

नवी दिल्ली : जर तुम्हीही बँकेकडून (Bank) एखादे कर्ज (Loan) घेतले असेल आणि त्याचे हप्ते चुकविताना नाकेनऊ येत असतील तर ? घाबरु नका. बँकेचे वसुली अधिकारी (Recovery Officer) तुम्हाला नाहक त्रास देतील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण आता ग्राहकांना ही काही अधिकार देण्यात आले आहे. काय आहेत हे अधिकार, जाणून घेऊयात..

अनेक जण वाहन कर्ज (Car Loan), शैक्षणिक कर्ज (Education Loan) लग्न अथवा व्यावसायिक कर्ज (Business Loan), गृह कर्ज (Home Loan) घेतात. बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्सचा भडिमार करतात.

कर्ज फेडणे हे तुमच्यासाठी फायदेशीरच असते. कारण त्यामुळे पुढे आर्थिक चणचण जाणवली की तुम्हाला लवकर कर्ज मिळते. पण अनेकदा काही आर्थिक अडचणींमुळे कर्ज वेळेत फेडल्या जात नाही.

हे सुद्धा वाचा

अशावेळी बँका ग्राहकाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सातत्याने आठवण करुन देतात. ग्राहकांना कॉल, एसएमएस, ई-मेल पाठवितात. बँका एखाद्यावेळी हप्ता चुकला तर कानाडोळा करतात. पण जर तुम्ही हप्ताचे भरले नाहीतर मग अडचण येते.

अनेक दिवसांपासून कर्ज थकले असेल तर बँका रिमाईंडर नोटीस न पाठविता, घरी थेट रिकव्हरी एजंट, म्हणजे वसुली पंटर पाठवितात. त्यांच्यामार्फत बँका धमकवतात. घरातील सदस्यांसमोर अपमानकारक बोलतात.

आतापर्यंत याप्रकरणात बँकांना अनेक अधिकार होते. रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून बँका ग्राहकांना दहशतीखाली ठेवत होत्या. ग्राहकांना घर विक्री अथवा दाग-दागिने विक्री करायला भाग पाडतात.

पण आता ग्राहकांनाही काही अधिकार देण्यात आले आहे. ग्राहक आता या वसुली प्रकराविरुद्ध पोलिसांकडे दाद मागू शकतात. एवढेच नाही तर नुकसान भरपाई ही त्यांना मागता येते.

बँकांना कर्जाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी त्यांना RBI च्या नियमांचे पालन मात्र करावे लागते. बँकेचा रिकव्हरी एजंट कर्ज बुडव्याच्या घरी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वाजेदरम्यानच कॉल करु शकतात.

ग्राहकाच्या घरी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वाजेदरम्यानच त्यांना घरी येऊन कर्ज वसुली मागता येईल. त्यानंतर वसुली एजंट आल्यास मात्र ग्राहकाला तक्रार दाखल करता येते.

ग्राहकाने 90 दिवसांच्या आत हप्ते जमा केले नाही तर बँक ग्राहकाला नोटीस पाठविते. त्यानंतर पुढील 60 दिवसांचा कालावधी देण्यात येतो. ही मुदत संपल्यास बँक पुढील कारवाई करण्यास मोकळी असते.

जर ग्राहकांनी कर्जाची परतफेड केली नाही तर बँक वाहन, घर अथवा तारण ठेवलेली वस्तू, संपत्ती, मालमत्ता विक्री करुन कर्ज वसुली करु शकते. पण हे करताना बँकांना नियमांचे पालन करावे लागते.

रिकव्हरी एजंटने कर्ज वसुली करताना अपमान केल्यास, आपत्तीजनक शब्दांचा वापर केल्यास, मारहाण केल्यास त्याविरोधात ग्राहकाला पोलिसांमध्ये आणि बँकेकडे तक्रार करता येते.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.