Bank Rules : Bank Rules : ‘आता लंच टाईम आहे, नंतर या’ असं जर बँकेत कोण म्हणालं, तर ही गोष्ट कराच!

एखाद्या बँकेतील कर्मचारी तुमचे काम करण्यास टाळाटाळ करत असतील वा वेळकाढूपणा करत असेल, तर यासंबंधी बँकेच्या ग्रीव्हिअंस रिड्रेसल नंबर वर फोन करून तक्रार दाखल करू शकता. नाहीतर तुम्ही सरळ रिझर्व्ह बँकेकडेही तक्रार नोंदवू शकता.

Bank Rules : Bank Rules : 'आता लंच टाईम आहे, नंतर या' असं जर बँकेत कोण म्हणालं, तर ही गोष्ट कराच!
Image Credit source: Aajtak
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 1:31 PM

बँक (Bank) कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. एखाद्या महत्वाच्या कामासाठी आपण बँकेत जातो आणि आपल्याला लंच टाइम नंतर येण्यास सांगितले जाते. दिलेल्या वेळेवर परत गेलो, तर संबंधित कर्मचारी कधीकधी जागेवरच नसतो. आपलं काम अडलेलं असतं म्हणून आपण काहीच न बोलता त्यांची शांतपणे वाट पाहतो, पण बँक कर्मचारी मात्र काम करण्यात सरळ टाळाटाळ करताना अथवा वेळकाढूपणा करताना दिसतात. मात्र त्यांच्या या मनमानीला चाप लावणेही महत्वाचे असते. अशावेळी तुम्ही सरळ रिझर्व्ह बँकेकडे (Reserve Bank of India) तक्रार (Complaint) नोंदवून संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करू शकता. बँकिग सर्व्हिसद्वारे बँकेच्या ग्राहकांना काही अधिकार देण्यात आले असून, त्याची माहिती नसल्यास ते त्या अधिकारांचा लाभ घेऊ शकत नाहीत. बँकांनी ग्राहकांशी योग्य व्यवहार करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास ग्राहक थेट रिझर्व्ह बँकेकडे यासंदर्भात तक्रार नोंदवू शकतात. तुमच्या संदर्भात अशी कोणतीही घटना घडली तर तुम्ही बँकिंग लोकपालांकडे तक्रार नोंदवून त्याचे निवारण करण्याची मागणी करु शकता.

बँक ग्राहकांचे अधिकार

बँक ग्राहकांकडे अनेक अधिकार असतात, मात्र त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने ग्राहक, बँक कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सहन करत शांत बसतात. एखादा बँक कर्मचारी तुमचे काम करण्यास वेळ लावत असेल तर तुम्ही त्याविरोधात बँक मॅनेजरकडे तक्रार नोंदवू शकता. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सर्व बँकांचे ग्रीव्हिअन्स रिड्रेसल फोरम (Grievance Redressal Forum) असतात. त्याद्वारे तुम्ही तुमच्या तक्रारीचे निवारण करण्याची मागणी करू शकता. तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल, तेथील एखाद्या कर्मचाऱ्याची तक्रार नोंदवायची असेल तर संबंधित बँकेच्या ग्रीव्हिअन्स रिड्रेसल नंबरवर फोन करू शकता. त्याशिवाय बँकेच्या टोल फ्री (Toll Free) नंबरवरही तक्रार नोंदवू शकता. काही बँकांनी ग्राहकांच्या तक्रार निवारणीसाठी ऑनलाइन तक्रार दाखल ( Online Complaint) करण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे.

हे सुद्धा वाचा

अशी नोंदवा आपली तक्रार

देशातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)ग्राहकांसाठी 1800-425-3800/ 1-800-11-22-11 हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिला आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) कर्मचाऱ्यासंदर्भात कोणतीही तक्रार असेल तर पीएनबीच्या कस्टमर केअरवर संपर्क साधू शकता. तसेच कर्मचाऱ्यांसदर्भात बँकिंग लोकपालांकडे कॉल करून किंवा ऑनलाइनच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकता. https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉग-इन करून तुम्ही तक्रार दाखल करू शकता. अथवा CRPC@rbi.org.in या ई-मेल आयडीवर मेलही पाठवू शकता. 14448 या टोल फ्री नंबरचा वापर करूनही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.