Bank Holidays in September 2022 | ऑगस्ट महिना(August) संपाण्यास आता जेमतेम एक आठवडा उरला आहे. लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. तर इतर सण ही पुढील महिन्यात हजेरी लावणार आहे. या सण उत्सवाच्या काळात बँकांही सुट्यांमुळे (Bank Holidays) बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात (September) बँका 13 दिवस बंद राहतील. बँकांतील व्यवहार आणि कामे सर्वांनाच करावी लागतात. त्यामुळे सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यकआहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे तुम्हाला लवकर पूर्ण करता येतील. पुढील महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार असल्या तरी देशभरात सर्वच ठिकाणी एकाचवेळी बँका बंद राहणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सुट्ट्या प्रादेशिक आहेत. याचा अर्थ काही राज्यांमध्ये काही दिवस फक्त बँका बंद राहतील पण इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज (Bank Working) नेहमीप्रमाणे सुरू राहील.