Bank : आजपासून बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज होणार प्रभावित सरकारच्या धोरणाविरोधात संघटनांचा आक्रमक पवित्रा

Bank : आजपासून बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज होणार प्रभावित सरकारच्या धोरणाविरोधात संघटनांचा आक्रमक पवित्रा
Image Credit source: TV9

आजपासून बँक कर्मचारी संघटना संपावर जात आहेत. हा संप आज आणि उद्या असा दोन दिवस असला तरी 31 मार्च रोजी सरत्या आर्थिक वर्षाचे व्यवहार पूर्ण करायचे असल्याने बँकेत त्यासंबंधीचे कामकाज होईल. त्यामुळे तीन दिवस बँकेच्या कामकाजासाठी नागरिकांना थांबावे लागणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 28, 2022 | 9:48 AM

मुंबई :  सरकारची आर्थिक धोरणे आणि कर्मचा-यांच्याविरोधातील नियमांमुळे अखेर बॅक कर्मचारी संघटनांनी (Trade Unions) संपाचे हत्यार उपसले आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि विविध क्षेत्रातील संघटनांनी संयुक्त मंच स्थापन केला असून आजपासून या संघटना संपावर जात आहे. 28 आणि 29 रोजी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे (Bank Strike) बँकाचे कामकाज प्रभावित राहणार आहे. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याने त्यासंबंधी सर्व कामाचा निपटाराही याच आर्थिक वर्षात (fiscal years) पूर्ण करण्याचे धोरण असल्याने 31 मार्च रोजी ही बँकेत सर्वसामान्यांना सेवा मिळणार नाही. त्यामुळे या आठवड्यात तीन दिवस बँक कामकाजाला ब्रेक लागणार आहे. अर्थात सर्वच बँक कर्मचारी संघटना दोन दिवसांच्या संपात सहभागी नाहीत. तरीही कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. या संपामागची कारणे आणि संपामुळे कामकाज प्रभावित होऊ नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती घेऊयात..

संघटनांच्या मागण्या काय?

कामगार संघटना सरकारकडे कामगार संहिता रद्द करण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारने नवीन लेबर कोड आणला असून त्यात 3 दिवस रजा आणि 4 दिवस काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय वेतनासाठीही अनेक नियम करण्यात आले आहेत. त्यात किमान वेतनाची तरतूद असून त्यात सरकार देशभरातील किमान वेतन निश्चित करेल. नवीन लेबर कोड लागू झाल्याने देशातील किमान 50 कोटी कामगार आणि मजुरांना वेळेवर निश्चित वेतन मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे. ग्रॅच्युइटी साठीचा 5 वर्षांचा नियम रद्द करण्यात आला आहे. कामगार संघटना या लेबर कोडला विरोध करत आहेत. तसेच कामगार संघटना कोणत्याही कंपनीच्या खासगीकरणाच्या बाजूने नाहीत. सरकारने आपल्या यादीत अनेक सरकारी कंपन्यांचा समावेश केला आहे, ज्यांचे खासगीकरण केले जाणार आहे.

कामगार संघटनांचा विरोध

एअर इंडियानंतर एलआयसीच्या निर्गुंतवणुकीचा सरकारचा निर्णय संघटनाना रुचलेला नाही. तोट्यातील सरकारी कंपन्या विकून महसुली तूट भरून काढण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. अशा कोणत्याही प्रयत्नांना कामगार संघटनांचा विरोध आहे. या सर्व संघटना केंद्र सरकारच्या नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन अर्थात एनएमपी रद्द करण्याची मागणी करत आहेत. एनएमपीच्या माध्यमातून सरकारी कंपन्यांना भाडेपट्ट्यावर देऊन सरकार त्यातून कमाईची संधी शोधत आहे. सरकारच्या यादीत अनेक कंपन्या आणि मालमत्तांचाही समावेश आहे. त्याला विरोध होत आहे. सरकारने मनरेगा अंतर्गत मजुरीची रक्कम वाढवावी, अशी मागणीही कामगार संघटनांकडून केली जात आहे. जेथे कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत, त्यांना पगारावर किंवा ठराविक मुदतीसाठी घेण्याची मागणी केली जात आहे.

बँकांची तयारी काय?

एसबीआयने सांगितले की त्यांनी संपाच्या दिवसांमध्ये आपल्या शाखा आणि कार्यालयांच्या सामान्य कामकाजासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. एसबीआयने म्हटले आहे की, “संपामुळे आमच्या बँकेच्या कामावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. एआयबीईए, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यांनी हा संप पुकारला आहे. या संपाला तोंड देण्यासाठी आणि सर्वसामान्य बँकिंग सेवा सुरु ठेवण्यासाठी बँकांनी काही उपाययोजना केल्या आहेत.

इतर बातम्या

Aurangabad | स्वबळावर लढण्याची तयारी, पण सदस्य नोंदणी थंडच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय दिल्या सूचना?

शेतकऱ्यांनो चिंता सोडा कामाला लागा, पंजाब डख यांचा पावसाविषयी काय आहे अंदाज?

नाशिकमध्ये शेततळ्यात पडून 2 सख्या भावांचा मृत्यू; लोणवाडी परिसरात हळहळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें