AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारसोबतच आता या दिवशीही बंद राहणार बॅंक? फक्त 5 दिवसच होणार काम, नवे नियम लागू

बॅंकांबाबत काहीना काही नवीन नियम लागू करण्यात येतच असतात. आताही बॅंकांबाबत असेच काहीसे नवे नियम लागू करण्यात येणार असल्याचं म्हटंल जात आहे. या नियमानुसार आता बॅंक रविवार प्रमाणे या दिवशी देखील बंद असणार असल्याचं म्हटलं जात आहे. बॅंकांच्या नियमांमध्ये नक्की काय बदल झालेत ते जाणून घेऊयात.

रविवारसोबतच आता या दिवशीही बंद राहणार बॅंक? फक्त 5 दिवसच होणार काम, नवे नियम लागू
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2025 | 2:08 PM
Share

आजकाल अनेक क्षेत्रांमध्ये 5 दिवसांचा आठवडा म्हणजेच आठवड्यातून फक्त पाच दिवस काम आणि शनिवार-रविवार साप्ताहिक सुट्टी असा नियम करण्यात आला आहे. आता बँकांमध्ये देखील असा नियम लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता दर शनिवारी बँकांमध्ये सुट्टी असणार असल्याचं म्हटलं जातं होतं. येणाऱ्या काळात बँका फक्त सोमवार ते शुक्रवार काम करतील. कारण सरकारी बँका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बंद असतात. बँका पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारीही उघड्या असतात. बॅंक कर्मचाऱ्यांनी आता दर शनिवारी सुट्टी देण्याचा प्रस्ताव सरकारकडे केला होता.

बँक संघटनांनी सरकारला प्रस्ताव सादर केला

लोकसभेत या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांकडून सर्व शनिवारी बँका बंद राहाव्यात असा प्रस्ताव आला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी संयुक्तपणे हा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. या संघटनांचे म्हणणे आहे की यामुळे बँक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामाचे वातावरण आणखी सुधारेल.

आता खरंच दर शनिवारी आणि रविवारी बँका बंद राहणार का?

बँकांमध्ये आणखी एक नवीन नियम करण्यात येणार असल्याचं म्हटंल जात आहे. या नवीन महिन्यानुसार आता बँका आता आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करेल. याशिवाय आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी नक्कीच आहे. या नियमाच्या अंमलबजावणीमुळे बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल असं म्हटलं जातं.

करार झाला आहे?

इंडियन बँक्स फेडरेशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटनेत आठवड्यातून 5 दिवस काम करण्याचा आणि बँकेला 2 दिवस सुट्टीच्या नियमाबाबत आधीच करार झाला आहे.पण या कराराला आरबीआय आणि सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. जर सरकार आणि आरबीआय या करारावर सहमत झाले तर बँकेला आठवड्यातून 5 दिवस काम असणार आहे . तसेच 2 दिवसांच्या सुट्टीचा नियम लवकरच लागू केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बँक कर्मचारी फक्त मागणी करत आहेत आणि आशावादी आहेत.

नवीन नियम आल्यानंतर बँकेची वेळही बदलणार

बँकेत 5 दिवसांच्या कामाचा आणि 2 दिवसांच्या सुट्टीचा नियम आल्यानंतर बँकेची वेळ देखील बदलू शकते. सर्व बँका सकाळी 10:00 ऐवजी सकाळी 9:45 वाजता उघडतील. याशिवाय बँका सायंकाळी 4:00 ऐवजी 5:30 वाजता बंद होतील. यासाठी बँक कर्मचाऱ्यांना दररोज 45 मिनिटे अतिरिक्त काम करावे लागेल.

बँक कर्मचारी निर्णयाची वाट पाहत आहेत

सरकार आणि आरबीआयने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच बँकांमध्ये 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टीचा नियम लागू करता येईल. जर सरकार आणि आरबीआय यावर सहमत झाले तर बँकांमध्ये नवीन नियम लागू करता येईल. बँक कर्मचारीही या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2015 मध्ये सरकार आणि आरबीआयने बँकेत दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टीची मागणी मान्य करून हा नियम लागू केला होता. आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी बँकेत 5 दिवस काम असेल आणि आठवड्यातून दोन दिवस सुट्टीचा नियम लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार आणि आरबीआय या संदर्भात काय आणि केव्हा निर्णय घेतील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.