Todays Gold Price : सोनं खरेदीला जाताय! खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

लग्नसराईमुळे सोन्याचे दर वाढल्याचं दिसून येतंय. जाणून घ्या आजच्या सोनं-चांदीच्या किंमती

Todays Gold Price : सोनं खरेदीला जाताय! खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
आजचे सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 1:15 PM

मुंबई :  सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोनं-चांदीच्या किंमतींकडे (gold and silver price,) सारखं लक्ष असतं. सोनं खरेदी करताना देखील सोनं चांदीचे (gold and silver) दर पाहून गेल्याच खरेदीचा आवाका येतो. मागच्या घरसणीनंतर आज सोन्याचे भाव (Gold Price) वाढले. सोन्याचा दर आज 53 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. 24 कॅरेट सोन्यासाठी 10 ग्रॅमचा भाव 53 हजार 440 रुपये होता. काही दिवसांपासून सोन्याचे दर 53 हजार 500 च्या वर व्यवहार करत आहेत. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा सोन्याचा दर 48 हजार 990 रुपये आहे. त्यामुळे लग्न सोहळे आले की सोनं आणि चांदीच्या किंमती वाढू लागतात. लग्नसराई असली की सोनं आणि चांदी खरेदी वाढते. मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी खरेदी होऊ लागते. त्यामुळे देखील सोनं चांदीचे दर वाढल्याचं बघायला मिळतं.  सोन्याचे दर हे प्रत्येक ठिाकाणी वेगवेगळे असतात. त्या त्या ठिकाणी तेथिल स्थानिक किंमती वेगवेगळ्या असतात.

सोन्याच्या किंमतीवर परिणाम करणारे घटक

सोन्याच्या दरावर अनेक घटक परिणाम करत असतात. त्यामधला प्रमुख घटक म्हणजे लवकरच अमेरिकेच्या जीडीपीचा डाटा समोर येणार आहे. आकडेवारी अपक्षेनुसार असल्यास सोने स्वस्त होऊ शकते. मात्र त्याचवेळी भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात भारतात सोन्याला मोठी मागणी असते, सोन्याची मागणी वाढल्याने भारतात सोन्याचे दर वाढू शकतात. तसेच रशिया आणि युक्रेयुद्ध सुरूच राहिल्यास त्याचा देखील मोठा परिणाम हा सराफा बाजारपेठेवर झाल्याचे पहायला मिळू शकते.

लग्नसराई आणि चढ्या किंमती

लग्नसराई असली की सोन्याचे दर आपण गेल्या अनेक वर्षांपासून चढेच पाहतो. या काळात सोन्याची अधिक प्रमाणात खरेदी होत असते. त्यामुळे हा खास सोनं खरेदीचा सीजन असल्याचं सराफा व्यापाऱ्यांमध्ये चर्चा असते. सोन्याची खरेदी म्हटलं की कोणतंही लग्नकार्य असलं की केली जाते.  ताडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दिवशी देखील लोक अवर्जून सोन्याची किंवा कोणत्याही धातुची खरेदी करतात. या काळात देखील सोन्याला चांगलात डिमांड असतो. या काळात सोन्यासह चांदीची मागणी देखील मोठ्या प्रमाणात असते. सोन्याच्या किंमतीत चढउतार होत असतात. अनेक ठिकाणी सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये तफावतही दिसून येईल. कारण, त्या ठिकाणच्या स्थानिक किंमती आणि तेथिल  टॅक्स हे वेगवेगळे असू शकतात.

सोनं-चांदीचे दर

24 कॅरेट सोन्यासाठी 10 ग्रॅमचा भाव 53 हजार 440 रुपये होता. काही दिवसांपासून सोन्याचे दर 53 हजार 500 च्या वर व्यवहार करत आहेत. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा सोन्याचा दर 48 हजार 990 रुपये आहे.

इतर बातम्या

University Exams : आंदोलनं बंद करा, गप अभ्यास करा ! ठरलंय !! विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत

Aurangabad | औरंगाबादेत जमावबंदी, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

Mahindra EV : महिंद्राची ‘ही’ इलेक्ट्रिक बजेट कार लवकरच होणार लाँच, काय आहे किंमत?

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.