सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 31 ऑगस्टपासून ‘हे’ नियम बदलणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 13, 2021 | 6:31 AM

Gold Hallmarking | केंद्र सरकारने येत्या 31 ऑगस्टपासून एका नव्या नियमाची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. त्यानुसार हॉलमार्किंगसाठी सराफा व्यापाऱ्यांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल.

सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 31 ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार
सोन्याचे दागिने

मुंबई: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्क हा त्यांच्या शुद्धतेची खात्री दर्शविणारा असतो. अनेक ज्वेलर्स संपूर्ण प्रक्रियेचे पालन न करताच दागिन्यांवर हॉलमार्क लावतात. त्यामुळे ग्राहकांनी दागिने खरेदी करताना हॉलमार्क खरा आहे किंवा नाही, हे तपासून घेतले पाहिजे. हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचा त्रिकोणी आकाराचा लोगो असतो. त्यामध्ये हॉलमार्किंग केंद्रासह सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण नमूद केलेले असते. तसेच दागिना कधी घडवला याची तारीख आणि संबंधित ज्वेलर्सचा लोगोही असतो.

केंद्र सरकारने येत्या 31 ऑगस्टपासून एका नव्या नियमाची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. त्यानुसार हॉलमार्किंगसाठी सराफा व्यापाऱ्यांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल. नंतरच्या काळात नुतनीकरणाची गरज भासणार नाही. हॉलमार्किंगच्या नियमाचा व्यापारी आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.

हॉलमार्किंग असलेला दागिना खरेदी केल्याच्या काही वर्षांनंतर विकायला काढल्यास त्याचे मूल्य घटणार (Depriciation Cost) नाही. हे सोने पूर्णपणे शुद्ध असल्याने तुम्हाला विक्रीनंतर दागिन्याची संपूर्ण किंमत मिळेल.

हॉलमार्किंगमुळे व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक केल्यामुळे लहान व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे पेढ्यांवर संगणक आणि हॉलमार्किंगविषयी ज्ञान असलेले कर्मचारी ठेवावे लागतील. याशिवाय, हॉलमार्किंगसाठी दागिने पाठवायचे असल्यास ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते.

लहान व्यापाऱ्यांना या ऑनलाईन व्यवहारांची तितकीशी सवय नाही. तसेच लहान ज्वेलर्स किंवा पेढ्यांवर दागिन्यांची संख्या अधिक असल्याने हॉलमार्किंग सेंटर्सना त्याचा तपशील ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.

BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.

भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

संबंधित बातम्या:

Gold Silver price today: सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या आजचा दर

Gold Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा ग्राहकांना काय फायदा होणार?

Gold Hallmarking: सोने हॉलमार्किंगचा नवा नियम लांबणीवर पडणार? वाचा नेमकं कारण

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI