डेट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहेत का?, जाणून घ्या गुंतवणुकीपूर्वी काय काळजी घ्यावी

तरलता आणि गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून डेट फंड गुंतवणुकीसाठी चांगले आहेत, इक्विटी फंडाच्या तुलनेत डेट फंड सुरक्षित आहेत हेही तेवढंच खरं आहे. मात्र, डेट फंड पूर्णपणे जोखीममुक्त नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

डेट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहेत का?, जाणून घ्या गुंतवणुकीपूर्वी काय काळजी घ्यावी
अजय देशपांडे

|

Jun 18, 2022 | 10:12 AM

मुंबईतील श्रद्धाचा म्युच्युअल फंड (Mutual funds) विशेषत: डेट फंडावरून नेहमी गोंधळ सुरू असतो. ऐकीव माहितीवरून तिने डेट फंडाबाबत आपलं मत बनवलंय. डेट फंड सर्वात सुरक्षीत म्युच्युअल फंड आहेत . डेट फंडात जोखीम (Risk) नसल्यानं गुंतवणूक (Investment) करावी. डेट फंड कधी निगेटिव्ह रिटर्न देत नाहीत, अशी माहिती तिला मिळाली. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात फ्रैकलिन टेम्पलटन डेट म्युच्युअल फंडावर आलेलं संकट समोर आलं नसतं तर तिचं मत कायम राहिलं असतं. नक्की परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी तिने एके दिवशी आर्थिक सल्लागार मोहितची भेट घेतली. तरलता आणि गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून डेट फंड गुंतवणुकीसाठी चांगले आहेत, इक्विटी फंडाच्या तुलनेत डेट फंड सुरक्षित आहेत हेही तेवढंच खरं आहे. मात्र, डेट फंड पूर्णपणे जोखीममुक्त नसल्याचे श्रद्धाला मोहितने सांगितले.

16 विविध श्रेणीत विभागनी

एसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच AMFI ने डेट म्‍यूचुअल फंड्सची 16 विविध श्रेणीत विभागनी केलीये. यात ओव्हरनाईट फंड, लिक्विड फंड, कार्पोरेट बॉण्ड फंड, क्रेडिट रिस्क फंड, लॉग ड्युरेशन फंड आणि बँकिंग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख फंड यांचा समावेश होतो. काही फंड योजना गुणवत्तेवर जोर देतात तर काही रिटर्नवर.आता गुंतवणूकदारांनी ठरवायचं त्यांना काय पाहिजे. एखाद्या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूकदार जोखीम घेऊ शकता का ? हेही पाहिलं पाहिजे. मुळात प्रत्येक डेट फंडात क्रेडिट, व्याज दर, तरलता आणि एकाच जागी गुंतवणूक करण्याची जोखीम असते. उदाहरणार्थ क्रेडिट रिस्क फंडात सगळयात जास्त जोखीम असते. याऊलट गिल्ट फंडात सगळ्यात कमी जोखीम असते. ब्रँडच्या आधारे किंवा मोठं नाव आहे म्हणून कधीही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करू नये, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. गुंतवणूक करताना फंडाची मागील कामगिरी, व्यवस्थापनाचा दृष्टीकोन, रिस्क प्रोफाईल यासारखे घटकही पहाणे महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय सांगतात?

सगळेच डेट फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले असतात असे मानले जाते. मात्र त्याला काही अपवादही आहेत. उदाहरणार्थ लिक्विड म्युच्युअल फंड आणि अल्पकालिन डेट फंड सहा महिने ते दोन वर्षापर्यंतच्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी उपयोगी आहेत. डेट फंड कधी निगेटिव्ह रिटर्न देत नाहीत याबाबत अनेक जणांचा भ्रम आहे. फंडातील अंडरलेइंग डेट सिक्युरिटीमध्ये क्रेडिट डिफॉल्ट किंवा डाऊनग्रेड होत असल्यास फंडाची नेट अॅसेट व्हॅल्यू म्हणजेच एनएव्ही कमी होते. फंडाची रोख्यात किती गुंतवणूक आहे हेही महत्वाचं आहे. गुंतवणुकीच्या कालावधीवरून डेट फंड अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी जोखीम घेण्याची क्षमता आणि कालावधीचा विचार करून योग्य फंडाची निवड करावी, असा सल्ला प्रॉफिश‍िएंट इक्‍विटीज प्रायव्हेट लिमिटेटचे फाउंडर आणि संचालक मनोज डालमिया यांनी दिलाय. प्रत्येक वेळी आर्थिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे फक्त फंडाची मागील कामगिरी पाहूनच गुंतवणूक करू नये. कोणत्या घटकांमुळे म्युच्युअल फंड यशस्वी होतो याकडे लक्ष द्यावं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें