5

आयकर रिटन भरणाऱ्यांच्या संख्येत घट; …या कारणांमुळे घटली करदात्यांची संख्या

चालू वर्षामध्ये आयकर रिटन भरणाऱ्यांची संख्या कोविडपूर्व काळापेक्षा तुलनेने खूपच कमी आहे. आयकर रिटन भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असताना देखील इनकम टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेला म्हणावी तशी गती मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. सर्वसाधारणपणे आयकर रिटन भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै असते. परंतु कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून इनकम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

आयकर रिटन भरणाऱ्यांच्या संख्येत घट; ...या कारणांमुळे घटली करदात्यांची संख्या
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 8:50 AM

मुंबई : चालू वर्षामध्ये आयकर रिटन भरणाऱ्यांची संख्या कोविडपूर्व काळापेक्षा तुलनेने खूपच कमी आहे. आयकर रिटन भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असताना देखील इनकम टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेला म्हणावी तशी गती मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. सर्वसाधारणपणे आयकर रिटन भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै असते. परंतु कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून इनकम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. सुरुवातीला आयकर रिटन भरण्यासाठी 31 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र इनकम टॅक्स विभागाच्या साईटवर काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे आयकर रिटन दाखल करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारकडून आयकर रिटन भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता आयकर रिटन दाखल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र तरी देखील यावर्षी आयकर रिटन दाखल करणाऱ्यांची संख्या कमीच आहे.

आतापर्यंत अर्ध्याच लोकांनी भरला टॅक्स

आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 6.74 कोटी लोकांनी इनकम टॅक्स भरला होता. परंतु या वर्षी आतापर्यंत केवळ 3.7 कोटी लोकांनीच आयकर रिटन दाखल केला आहे. याचाच अर्थ  या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ अर्ध्या लोकांनी इनकम टॅक्स भरला आहे. आयकर रिटन दाखल करण्याची शेवटी तारिख 31 डिसेंबर आहे. मागील पातळी गाठण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत आणखी 3.7 कोटी करदात्यांनी कर भरणे अपेक्षीत आहे.  दिवसाला 13 लाख करदात्यांनी कर भरला तरच आपण ते उद्दिष्ट गाठू शकू, मात्र सध्या दिवसाकाळी केवळ चार लाख लोकच आयकर रिटन दाखल करत असल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.

… म्हणून घटली संख्या

इनकम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या घटली आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणेज वेबसाईमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तात्रिक समस्या हे आहे. इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर आयकर रिटन दाखल करताना अनेक समस्या येत आहेत. त्या वेळेवर दूर होत नसल्याने करदात्यांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच कोरोनाचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या, त्यातील अनेकांना आजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यांचे आर्थिक स्त्रोत बंद असल्याने त्यांनी इनकम टॅक्स भरला नाही, त्यामुळे यंदा आयकर रिटन दाखल करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

संबंधित बातम्या

‘हे’ आहेत सर्वोत्तम पाच क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्यांचे फायदे

तुम्ही डेबिट कार्ड वापरता?; मग घ्या ‘ही’ काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

SBI Alert : एसबीआयचे ग्राहक आहात? ऑनलाइन-ऑफलाइनसंदर्भात बँकेनं दिलं महत्त्वाचं अपडेट

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?