Demat Account | हे काम केलं का? 1 ऑक्टोबरपासून डीमॅट अकाउंट होणार बंद!

Demat Account | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत टू फॅक्टर ऑथेंटिकेशन त्यांनी केले नसेल तर डीमॅट खाते हाताळणे अडचणीचे ठरेल. राष्ट्रीय शेअर बाजाराने 14 जून 202 रोजी याविषयीची सूचना दिली होती.

Demat Account | हे काम केलं का? 1 ऑक्टोबरपासून डीमॅट अकाउंट होणार बंद!
गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 9:47 AM

Demat Account | शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. त्यांनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन केले नसेल तर डीमॅट खाते (Demat Account) हाताळणे अडचणीचे ठरेल. राष्ट्रीय शेअर बाजाराने (National Stock Exchange) 14 जून 202 रोजी परिपत्रक काढले होते. त्यात 30 सप्टेंबरपर्यंत टू फॅक्टर ऑथेंटिकेशन(two-factor authentication) करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

लॉग इन करता येणार नाही

NSE ने दिलेल्या माहितीनुसार, खातेदारांना डिमॅट खात्यात लॉगइन करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फॅक्टर वापरावे लागते. दुसरा मार्ग हा नॉ़लेज फेक्टरचा आहे. पासवर्ड अथवा पिनच्या माध्यमातून खातेदार लॉग इन करतो. वन टाईम पासवर्ड (OTP), सिक्युरिटी टोकन यामाध्यमातूनही लॉग इन करता येते.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन

ईमेल आणि एसएमएस या दोन्ही माध्यमातून ओटीपी मिळेल. त्याआधारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन शक्य होईल. तसे न झाल्यास पासवर्ड, ओटीपी, पिन, सिक्युरीटी टोकन, युजर आयडी यांचा वापर करुन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

उरले 20 दिवस

NSE च्या परिपत्रकानुसार, 30 सप्टेंबर 2022 पूर्वी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (TOTP 2Factor) करणे आवश्यक आहे. त्याआधारे गुंतवणूकदाराने डीमॅट खात्यात लॉगिन करणे अनिवार्य आहे.

या पद्धतीने पूर्ण करा प्रक्रिया

NSEने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची प्रक्रिया सांगितली आहे. त्यानुसार, टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी ईमेल आणि एसएमएस माध्यमातून ओटीपी मिळेल. नेटवर्क एररमुळे ही प्रक्रिया खंडीत झाल्यास पासवर्ड, ओटीपी, पिन, सिक्युरीटी टोकन, युजर आयडी यांचा वापर करता येईल.

देशात 10 कोटी डी-मॅट खाते

National Securities Depository Limited (NDSL) and Central Depository Services (CDSL) यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोविड -19 दाखल होण्यापूर्वी म्हणजेच मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात 4.09 कोटी डीमॅट खाती होती. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात हा आकडा 6 कोटींवर पोहचला.आता हा आकडा 10 कोटींच्या पुढे गेला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.