AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan लवकर संपवायचं हे सीक्रेट तुम्हाला माहित आहे का?

तुम्हीपण जर होम लोन घेतले असेल तर तुम्हाला माहित असेल की, जितका होम लोन भरण्याचा कालावधी जितका जास्त तितके व्याज अधिक भरावे लागते. त्यामुळे तुम्ही काही गोष्टींचा अवलंब करुन हे होम लवकर लवकर संपवू शकता आणि व्याज वाचवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या ट्रिक फॉलो करायच्या आहेत.

Home Loan लवकर संपवायचं हे सीक्रेट तुम्हाला माहित आहे का?
| Updated on: Feb 20, 2024 | 8:36 PM
Share

Home loan repayment : गृहकर्ज घेतल्याशिवाय सर्वसामान्य लोकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अनेक वेळा कर वाचवण्याच्या उद्देशाने कर्जही घेतले जाते. पण कर्ज घेतले की, त्यावर व्याज हे भरावेच लागते. कर्ज कोणतंही असो त्यावर व्याज हे आकारलं जातंच. जेवढे जास्त हप्ते तेवढे व्याज ही जास्त भरावे लागते, त्यामुळे घर घेताना कमीत कमी हप्ते घेण्याचा प्रयत्न करावा. सर्वात जास्त काळ चालणारे कर्ज म्हणजे गृहकर्ज. बँकांसाठी, हे कर्ज सुरक्षित कर्ज असते. कारण यामध्ये घराची मालकीही बँकेकडे असते.

होम लोन घेण्याकडे अधिक कल

घरासाठी कर्ज घेणे हे चांगले नसले तरी देखील सर्वसामान्य लोकांना दुसरा पर्याय नसतो. काही लोकांना वाटते की, ते भाड्याच्या घरात देखील राहू शकतात. पण असं असले तरी अनेक जण गृहकर्ज घेतातच. आता कर्जाची परतफेड जितक्या लवकर कराल तितके चांगले असते. जितक्या लवकर डोक्यावरून कर्ज काढून टाकले जाईल तितक्या लवकर कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. म्हणजेच कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर पैशांबाबत आत्मविश्वास वाढतो. असे म्हटले जाते कारण काही काळानंतर कर्ज बहुतेक लोकांना घाबरू लागते आणि त्यांना कर्ज किती लवकर संपेल या समस्येचा सामना करावा लागतो.

काय आहे होम लोन लवकर क्लिअर करण्याचा फॉर्म्युला

आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, होम लोन साधारणपणे २० ते २५ वर्षांसाठी घेतले जाते. काही लोकं तीस वर्षापर्यंत पण लोन घेतात. हा कालावधी घेणारी व्यक्ती आपल्या सोयीनुसार काही वर्षे पुढे आणि मागे सरकते ही वेगळी बाब आहे.

EMI पेक्षा काही रक्कम जास्त द्या

होम लोन जर तुम्हाला लवकर बंद करायचे असेल तर तुम्हाला नियमित हप्त्यापेक्षा (EMI) काही रक्कम जास्त द्यावी जेणेकरून ही रक्कम लवकरात लवकर मुद्दलमधून कमी होईल. काही लोक म्हणतात की दरवर्षी काही हप्ता जास्त भरावा म्हणजे हप्त्याच्या रकमेइतकी रक्कम कर्ज खात्यात जमा करावी जेणेकरून कर्जाची मूळ रक्कम कमी करता येईल.

1. जर तुम्ही दरवर्षी कर्जाच्या शिल्लक रकमेपैकी 5 टक्के जास्त रक्कम जमा केली तर तुम्ही फक्त 12 वर्षात 20 रुपये कर्जाची परतफेड करू शकता. याचे कारण म्हणजे तुम्ही कर्ज घेतल्यापासून काही वर्षांत तुमचे उत्पन्न वाढलेले असते. परंतु बहुतेक लोक या वाढलेल्या उत्पन्नाचा काही भाग कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करत नाहीत. 2. तुम्ही तुमच्या खात्यात दरवर्षी आणखी एक EMI जमा केल्यास, तुम्ही 20 वर्षांचे कर्ज 17 वर्षांत पूर्ण करू शकता. 3. जर कोणत्याही कर्जदाराने बँकेशी बोलून त्याचा EMI 5 टक्क्यांनी वाढवला, तर तो 20 वर्षांचे कर्ज 13 वर्षांत पूर्ण करेल. 4. जर तुम्ही EMI 10 टक्क्यांनी वाढवला तर तुम्ही 10 वर्षांत कर्ज पूर्ण कराल.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.