ATM चे ‘हे’ 10 उपयोग तुम्हाला माहित आहे का? वाचा
ATM याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहिती असेल. पण, आम्ही आज काही खास माहिती सांगणार आहोत. डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण, ATM मधून तुम्ही कमीत कमी या 10 गोष्टी करू शकता. जाणून घेऊया.
आम्ही ATM याबद्दल तुम्हाला काही खास माहिती सांगणार आहोत. तसं तर ATM कार्डबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही, कारण हल्ली ते न वापरणारे फार कमी लोक अभावानेच असतील. पण अनेक जण ATM कार्डला केवळ पैसे काढण्याचे मशीन समजतात. बँकेच्या ATM मधून तुम्ही कमीत कमी या 10 गोष्टी करू शकता. जाणून घेऊया.
पैसे काढणे
ATM मधून पैसे काढणे हा त्याचा सर्वात सामान्य वापर आहे. डेबिट कार्डमधून पैसे काढण्यासाठी त्याचा चार अंकी पिन लक्षात ठेवावा लागतो.
खात्याचे बॅलेन्स जाणून घ्या
तुमच्या खात्यात किती शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही डेबिट कार्डचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तसेच गेल्या दहा दिवसांतील व्यवहार पाहता येतील.
फंड ट्रान्सफर
डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. निधी हस्तांतरणासाठी प्रत्येक बँकेच्या स्वत:च्या मर्यादा असतात. SBI च्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात तुम्ही रोज 40,000 रुपयांपर्यंत ट्रान्सफर करू शकता. यासाठी बँक कोणतेही शुल्क आकारत नाही.
क्रेडिट कार्ड पेमेंट
तुम्ही ATM द्वारे क्रेडिट कार्डची बिले भरू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे कार्ड आणि पिन नंबर आवश्यक आहे.
इतर खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करणे
ATM द्वारे तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. याशिवाय तुम्ही एका ATM कार्डशी 16 खाती लिंक करू शकता.
विमा हप्ता भरणे
तुम्ही ATM मधून विम्याचा हप्ता भरू शकता. LIC, HDFC लाईफ, वग लाईफ अशा अनेक कंपन्यांचे अनेक बँकांशी करार आहेत. बँकेच्या या सुविधेमुळे तुम्ही तुमचा विमा हप्ता भरू शकता. यासाठी तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी नंबर, ATM कार्ड आणि पिनची गरज भासणार आहे.
आम्ही तुम्हाला वर ATM याच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आपण फक्त पैसे काढतो आणि तेच आपल्याला माहिती असतं. पण वरील माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचं काम अधिक सोपं करू शकता. कारण, वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. एका कामात अनेक कामं झाल्यास आपला वेळही वाचू शकतो. त्यामुळे वरील माहिती तुमच्या उपयोगात येऊ शकते. काम सोपे करण्यासाठी त्या-त्या गोष्टींसंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. कारण, माहिती असली की कामही वेगाने होते.