AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Note Currency : नोटेवर काहीही खरडल्यास नोटच होणार रद्द ! एक छदाम ही नाही मिळणार, दावा कितपत सत्य

Note Currency : अशा नोटा खरंच चलनातून बाद होणार का?

Note Currency : नोटेवर काहीही खरडल्यास नोटच होणार रद्द ! एक छदाम ही नाही मिळणार, दावा कितपत सत्य
| Updated on: Jan 08, 2023 | 5:23 PM
Share

नवी दिल्ली : समाज माध्यमांवर (Social Media) सध्या एका व्हायरल मॅसेजची (Viral Massage) जोरदार चर्चा सुरु आहे. काही नोटांवर काहीतरी खरडलं जातं. त्यावर काहीही लिहण्यात येतं. त्यावर चित्र काढण्यात येतं. महापुरुषांच्या फोटोला विद्रुप करण्यात येतं. अशा नोटा चलनातून (Currency Note) बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) नावाने हा मॅसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नवीन मॅसेज नुसार, कोणत्याही नवीन नोटेवर असे काही लिहिलेले आढळल्यास ती नोटच रद्द करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या नोटेचे कोणतेच बाजार मूल्य नसेल. तो एक कागदाचा तुकडा होईल.

या मॅसेजमुळे अर्थातच व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये उलटसूलट चर्चांना उधाण आले. व्हायरल मॅसेजमध्ये आरबीआयने याविषयीचे मार्गदर्शक तत्वे जारी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या मॅसेजचा पत्र सूचना कार्यालयाने पडताळा (PIB Fact Check) घेतला आहे.

आपल्याकडे रोजच्या व्यवहारात अनेक चलनी नोटा येतात. त्यातील काही नोटांवर आकडेमोड, काहीतरी संदेश, कोणाचे तरी नाव, पत्ता अशा बाबी लिहिल्या असतात. अशा नोटा चलनातून बाद होण्याच्या या मॅसेजमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या नोटांचे मूल्य शून्य होणार असल्याचा दावा मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.

अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याविषयीचे अधिकृत वृत्तही प्रसार माध्यमांनी दिलेले नाही. तरीही हा मॅसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. परिणामी अशा नोटा न स्वीकारण्याचे प्रकारही घडत आहेत.

याप्रकरणाची PIB ने गंभीर दखल घेतली. PIB Fact Check ने मॅसेजचा पडताळा केला. हा मॅसेज पूर्णतः भ्रामक असल्याचे सिद्ध झाले. हा मॅसेज खोट आहे.  या बनावट मॅसेजकडे दुर्लक्ष करा.  त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PIB ने पडताळ्यानंतर याविषयीची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. हा मॅसेज खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय बँकेने अशा प्रकारे कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. खराब, फाटक्या नोटा बँकेतून बदलवून मिळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.