तुमच्याकडे एक रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही रातोरात होऊ शकता लखपती

तुमच्याकडे एक रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही रातोरात होऊ शकता लखपती
queen victoria 1 rs coin

जर तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट नंबरची किंवा एखाद्या ठराविक काळातील नाणं असेल तर तुम्हीही एका रात्रीत करोडपती होऊ शकता. (Earn more than 1 Lakh In A Minute If You Have This Rare One Rupee Coin)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jun 24, 2021 | 12:53 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या पॉकेट, पर्स किंवा कपाटात 1 किंवा 2 रुपयांची दुर्मिळ नाणी असतात. अनेकजण ही नाणी वर्षानुवर्षे जपून ठेवतात. पण हीच नाणी तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतात. तुम्हीही विचारात पडलात ना…पण हे खरं आहे. (Earn more than 1 Lakh In A Minute If You Have This Rare One Rupee Coin)

गेल्या काही दिवसांपासून अनेकांमध्ये जुन्या नोटा आणि नाण्याचा संग्रह करण्याचे प्रमाण वाढलं आहे. ज्या लोकांना अशा दुर्मिळ नाणी-नोटांचा संग्रह करण्याचा शौक असतो, ते या नोटा अत्यंत महागड्या किंमतीत विकत घेतात. जर तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट नंबरची किंवा एखाद्या ठराविक काळातील नाणं असेल तर तुम्हीही एका रात्रीत करोडपती होऊ शकता.

घरबसल्या पूर्ण होईल करोडपती बनण्याचे स्वप्न

सध्या अनेक ऑनलाईन वेबसाईटवर खूप जुन्या दुर्मिळ नोटा-नाणी विकल्या जात आहे. जर तुम्हाला जुन्या नाण्यांचा संग्रह करण्याचा शौक असेल तर तुम्हाला एका रात्रीत लाखो रुपयांचा फायदा मिळू शकतो. या वेबसाईटच्या माध्यमातून लखपती आणि करोडपती बनण्याचे स्वप्न घरबसल्या पूर्ण होऊ शकते.

आज आम्ही तुम्हाला अशाच एक रुपयांच्या नाण्याबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या कलेक्शनमध्ये असेल तर तुम्ही घरबसल्या करोडपती होऊ शकता. जर तुमच्याकडे 1 रुपयांचे हे ठराविक वैशिष्ट्यं असलेले दुर्मिळ नाणे असेल तर तुम्हाला लाख रुपये मिळू शकता.

1 रुपयांचे चांदीचे नाणे दुर्मिळ नाणे

सध्या एका ई-कॉमर्स साईट क्विकरवर क्विन व्हिक्टोरियाच्या (queen Victoria) 1862 काळातील नाण्यांची विक्री केली जात आहे. या वेबसाईटवर ही नाणी दीड लाख रुपयांपर्यंत विकली जात आहेत. 1862 मध्ये बनवलेल्या 1 रुपयांचे चांदीचे नाणे दुर्मिळ नाण्यांच्या श्रेणीत येतात. याची किंमत दीड लाख रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होईल.

अशी करा जुन्या दुर्मिळ नाणी-नोटांची विक्री?

जर तुमच्याकडेही 1 आणि 2 रुपयांची फार जुनी नोट किंवा दुर्मिळ नाणी असतील तर ते तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकता. यासाठी तुम्हाला Ebay, Quickr यासारख्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागले. त्यासाठी त्या ठराविक नाण्याचा एक फोटो क्लिक करा आणि तो साईटवर अपलोड करा. यानंतर खरेदीदार तुमच्याशी थेट संपर्क साधतील. यानंतर तुम्ही किंमत आणि डिलिव्हरी यासर्व गोष्टी ठरवून त्याची तुम्ही विक्री करु शकतो.

(Earn more than 1 Lakh In A Minute If You Have This Rare One Rupee Coin)

संबंधित बातम्या : 

नाणं छोटसंच, पण विकताना खणखणीत वाजलं; 138 कोटीला विक्री; वाचा खासियत!

तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें