AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR File : केवळ कायदेशीर सोपास्करच नाही, आयटीआर फाईलचे इतके मिळतात फायदे

ITR File : करदात्यांना प्राप्तिकर रिटर्न फाईल करणे केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नाही. तर त्याचे इतरही अनेक लाभ मिळतात. जर तुम्ही वेळेवर आयटीआर दाखल केला तर अनेक फायदे मिळतात.

ITR File : केवळ कायदेशीर सोपास्करच नाही, आयटीआर फाईलचे इतके मिळतात फायदे
| Updated on: Apr 18, 2023 | 4:49 PM
Share

नवी दिल्ली : भारतात कर हा केंद्र सरकारच्या कमाईचा मुख्य स्त्रोत आहे. प्राप्तिकराचा (Income Tax) त्यात मोठा वाटा आहे. नागरिकांच्या उत्पन्नावर आणि कमाईवर हा कर आकारण्यात येतो. या कराच्या कक्षेत येणाऱ्यांना प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राप्तिकर खाते एक विशिष्ट कालावधी निश्चित करते. या मर्यादीत काळातच करदात्यांना कर जमा करता येतो. या डेडलाईन पूर्वी आयटीआर दाखल करणे आवश्यक असते. करदात्यांना प्राप्तिकर रिटर्न फाईल (ITR File) करणे केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नाही. तर त्याचे इतरही अनेक लाभ मिळतात. जर तुम्ही वेळेवर आयटीआर दाखल केला तर अनेक फायदे मिळतात.  त्यामुळे तुम्हाला कर्ज प्रकरणात मोठा फायदा मिळतो.

दंड आणि व्याज वाचतो दंड आणि व्याज वाचविण्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे. या कालावधी दरम्यान हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड लागतो. जर तुम्ही फाईलिंग वेळेत जमा केले नाही तर 10,000 रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. याशिवाय जर तुमचा कर थकला तर तुम्हाला बचत रक्कमेवर व्याज चुकते करावे लागेल.

रिफंडचा दावा करा जर तुम्ही प्राप्तिकर खात्याच्या परिघात येत असाल आणि आयटीआर रिटर्न दाखल केले असेल तर तुम्हाला रिफंड दावा करता येईल. जर तुम्ही पीपीएफ आणि किसान विकास पत्रासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर 80 सी अंतर्गत तुम्हाला सवलत मागता येते. वेळेत आयकर रिटर्न भरला असेल तरच तुम्हाला रिफंडचा दावा दाखल करता येईल. पण वेळेच्या आत प्राप्तिकर रिटर्न भरला नाही तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही.

आर्थिक प्रोफाईल होईल मजबूत आयकर रिटर्न दाखल केल्यास तुमचा आर्थिक प्रोफाईल मजबूत होईल. क्रेडिट स्कोअर पण जोरदार होतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बँकेत अर्ज करता, तेव्हा बँका क्रेडिट स्कोअर तपासतात. याशिवाय क्रेडिट कार्ड आणि इतर आर्थिक गरजासाठी क्रेडिट स्कोअर आवश्यक असतो.

हे ठेवा लक्षात तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (विलंबित, सुधारित किंवा अपडेट केलेले) भरल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचा पडताळा केला नाही. ते सत्यापित केले नाही. तर आयकर विभाग ते पुढील प्रक्रियेसाठी घेणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचे नसल्याचे गृहीत धरण्यात येईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?