AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदान यादीतून नाव तर कमी नाही ना झालं, खात्री करुन घ्या 

देशात पुन्हा निवडणुकांचा हंगाम येऊ घातला आहे. तर निवडणूक आयोगाने जयत तयारी सुरु केली आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहे. सोबत ऐच्छिक स्वरुपात मतदान ओळखपत्राची  आधारकार्डशी लिंक करण्यात येत आहे. तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. 

मतदान यादीतून नाव तर कमी नाही ना झालं,  खात्री करुन घ्या 
Voter-Card
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 31, 2021 | 10:10 AM
Share

मुंबई : देशात यंदा पुन्हा निवडणुकांचा बार उडणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा सहित मणिपूर या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. तर त्यानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा क्रमांक आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरु केली आहे. भले तुम्ही या राज्यातील नसाल ही, परंतु, मतदार याद्यात तुमचे नाव आहे की नाही, याची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण काही तांत्रिक कारणामुळे तुमचे नाव यादीत कमी झाले असेल तर तुम्हाला नावाची नोंद करता येईल.

असे तपासा तुमचे नाव

मतदारांना त्यांच्या राज्याच्या मतदार यादीत नाव शोधता येते. ही सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांना ही सुविधा दिली आहे. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सर्वात अगोदरच तुमचे नाव, तुमचे विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव, नाव आणि आडनाव, लिंग यांची माहिती द्यावी लागेल. जिल्ह्यांच्या नावाआधारे ही तुमचे नाव मतदान यादीत शोधता येईल.

ऑनलाईन असे तपासा नाव

तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची खातरजमा करु शकता. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल अथवा लॅपटॉप, संगणक असायला हवा.

आता निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जा.

www.nvsp.in या पोर्टलवर लॉग इन करा

electoralsearch वर क्लिक करा

दोन पद्धतीने तुमेच नाव सर्च करता येईल

पहिली पद्धत- तुमची संपूर्ण माहिती जमा करा

यामध्ये तुमचे वडिलांचे/ पतिचे नाव द्या. वय, लिंग, जन्मतारीख, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव द्या

दुसरी पद्धत- तुमच्या मतदान ओळखपत्रावरील क्रमांक टाका. राज्याचे नाव देऊन सर्च पर्याय निवडा

अशी करा मतदान कार्डसाठी नोंद

घरबसल्या मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी अशी प्रक्रिया करता येईल

सर्वात अगोदर  https://www.nvsp.in/ निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर जा

नवीन मतदार रजिस्ट्रेशन ऑनलाईन अर्ज  हा पर्याय निवडा

फॉर्ममध्ये माहिती नोंदवा. त्यात नाव, पत्ता, जन्मतारीख ,मोबाईल क्रमांक, ई-मेल  याची माहिती काळजीपूर्वक भरा

तुम्ही दिलेल्या माहितीचा पुरावा म्हणून आधारकार्ड आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा

सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा

ई-मेल आयडीवर ओळखपत्रासंबंधीची लिंक पाठविण्यात येईल

याद्वारे ओळखपत्र तयार करण्यासंबंधीची सध्यस्थिती म्हणजे स्टेट्स पाहता येते.

एका महिन्यात मतदान ओळखपत्र तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल.

अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ओळखपत्रासाठी नोंदणी करता येईल

त्यासाठी सरकारी कार्यालयात फेरी मारण्याचा आणि वेळ वाया घालविण्याचा त्रास वाचेल.

संबंधीत बातम्या :

Nagpur crime | सावधान! तुमची मुलं मोबाईल पाहतात? आधी दाखविले अश्लील व्हिडीओ; मग केला चिमुकलीवर अत्याचार

NMC Scam | अबब! 415 रुपयांची मशीन 1,880 रुपयांना खरेदी; काही वस्तूंची चारपट, तर काहींची सहापट किमतीत खरेदी

Nagpur Vaccination | 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण; दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य मिळणार?

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?