Nagpur crime | सावधान! तुमची मुलं मोबाईल पाहतात? आधी दाखविले अश्लील व्हिडीओ; मग केला चिमुकलीवर अत्याचार

Nagpur crime | सावधान! तुमची मुलं मोबाईल पाहतात? आधी दाखविले अश्लील व्हिडीओ; मग केला चिमुकलीवर अत्याचार
प्रातिनिधिक फोटो

नागपुरात एक भयानक घटना घडली. एका आठ वर्षीय मुलीला आधी आरोपींनी अश्लील व्हिडीओ दाखविले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आईच्या लक्षात ही बाब येताच तीनं पोलिसांत तक्रार केली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 31, 2021 | 9:17 AM

नागपूर : शहरातील आठ वर्षीय मुलीवर दोन आरोपींकडून अत्याचार करण्यात आला. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. चिमुकलीच्या पालकांना कळल्यानंतर त्यांनी यासंदर्भात रितसर तक्रार दाखल केली. निखिल बंडू नेवारे (वय 24) आणि मनोहर दौलत शेलारे (वय 70), अशी आरोपींची नावे आहेत.

अश्लील व्हिडीओ बघायची लावली होती सवय

चिमुकलीला वेगवेगळे बहाणे करून ते घरी बोलावत असत. या घृणास्तप कृत्याची बाहेर वाच्यता होऊ नये, म्हणून ते तिला धाक दाखवत होते. आरोपींनी या चिमुकलीवर 12 ऑक्टोबर ते 21 डिसेंबरपर्यंत सलग हा गैरप्रकार केला. यादरम्यान, या आरोपींनी छोट्याशा या चिमुकलीला मोबाईलवर चित्रफीत बघण्याची सवय लावली. त्यामुळं ही निरागस बालिका तिच्या आईचा मोबाईल मिळाला की अशा चित्रफीत बघायला लागली. 21 डिसेंबरला तिला आईचा मोबाईल मिळाल्यानंतर ती अशाच प्रकारची चित्रफीत बघत होती. ती काय बघत आहे हे आईला दिसल्यानंतर तिने तिला रागावले. हे बघण्याचे तुला कुठून कळले, असे आईने तिला विचारले. त्यानंतर त्या चिमुकलीने आरोपींची नावे घेतली. आईला गांभीर्य कळल्यानंतर तिने तिच्यावर पाळत ठेवली. आरोपींनी बुधवारी या चिमुकलीला जवळ बोलावले. त्यानंतर तिच्या आईने आरोपींचा चांगलाच पानउतारा केला. त्यानंतर तिच्या आईने आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींनाही अटक केली आहे.

सैनिक पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या

दुसऱ्या घटनेत, सैनिक पती ड्युटीवर जाताच विरहात पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सीआरपीएफ कॅम्प शिवनगाव येथे उघडकीस आली. पूनम राजकुमार डगवार (31) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. राजकुमार डगवार हे सीआरपीएफमध्ये झारखंड राज्यात आहेत. पत्नी पूनम ही दोन मुलांसह शिवनगावातील सीआरपीएफ क्वॉर्टरमध्ये राहत होती. पती राजकुमार हे गेल्या आठवड्यात सुटीवर नागपुरात आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलांसह सासुरवाडीत मुक्काम केला. राजकुमार दोन दिवसांपूर्वी झारखंडला ड्युटीवर निघून गेले. तेव्हापासून पूनम तणावात होती. बुधवारी ती दोन्ही मुलांना घेऊन क्वॉर्टरवर निघून गेली. त्यानंतर पूनमने घरात सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

Nagpur crime | रक्षकच निघाला भक्षक! नोकरानेच उडवले 17 तोळे सोने; हुडकेश्वर पोलिसांनी कसा केला पर्दाफाश?

Video – Omicron restrictions | पालकमंत्री नितीन राऊत म्हणतात, लोकांचे जीव महत्त्वाचे; जाणून घ्या 31 डिसेंबरचे काय आहेत नागपुरात निर्बंध

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें