AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं रेशनकार्ड हरवलंय? टेंशन नॉट! आता अशांनाही मिळणार धान्य 

रेशन कार्ड घरी विसरल्यास किंवा नवीन काढायचे असल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण सरकारने आणली आहे एक अशी सोय, ज्यामुळे तुमचं रेशन कार्ड तुमच्यासोबत नसलं तरी तुमचं काम थांबू नये! चला, जाणून घेऊया या डिजिटल उपयाबद्दल जी तुमची धावपळ वाचवतील!

तुमचं रेशनकार्ड हरवलंय? टेंशन नॉट! आता अशांनाही मिळणार धान्य 
Ration CardImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 14, 2025 | 3:04 PM
Share

रेशन कार्ड हे आपल्या देशातील अनेक कुटुंबांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं ओळखपत्र आणि गरजेचं साधन आहे. या कार्डमुळे सरकारकडून स्वस्त दरात धान्य मिळण्यास मदत होते. पण अनेकदा असं होतं की, आपण रेशन दुकानात जातो आणि रेशन कार्ड घरीच विसरलेलं असतं. किंवा काहीजणांनी अजून रेशन कार्ड काढलेलंच नसतं. मग अशावेळी काय करायचं? धान्य मिळणार नाही का?

काळजी करू नका! भारत सरकारने रेशन कार्ड धारकांच्या सोयीसाठी एक खास मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘Mera Ration 2.0’. हे ॲप म्हणजे तुमच्या रेशन कार्डची डिजिटल प्रतच आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप असेल आणि प्रत्यक्ष रेशन कार्ड तुमच्याजवळ नसेल, तरीही तुमचं काम होऊ शकतं!

फोनवर रेशन कार्ड कसं मिळवाल?

जर तुम्ही रेशन दुकानात गेलात आणि रेशन कार्ड घरी विसरला असाल, तर तुम्ही खालीलप्रमाणे तुमच्या फोनवरच रेशन कार्ड दाखवून धान्य मिळवण्याचा प्रयत्न करू शकता:

  1. तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store किंवा Apple App Store वरून ‘Mera Ration 2.0’ हे ॲप डाउनलोड करून इंस्टॉल करा.
  2. ॲप उघडल्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकण्यास सांगितलं जाईल. तो तिथे टाका.
  3. आधार नंबर टाकल्यावर ‘Login with OTP’ या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून लॉगिन करा.
  4. लॉगिन यशस्वी झाल्यावर, तुमचं डिजिटल रेशन कार्ड आणि त्यावरील सर्व माहिती ॲपमध्ये उघडेल.
  5. आता तुम्ही हे ॲपमधील डिजिटल रेशन कार्ड रेशन दुकानदाराला दाखवून, तुमच्या हक्काचं धान्य मिळवण्यासाठी विचारू शकता.

नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?

जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल आणि सरकारी ऑफिसच्या चकरा मारायच्या नसतील, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाइटवरून (https://rcms.mahafood.gov.in/) किंवा आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करू शकता.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.