Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, दागिन्यांच्या खरेदीसाठी योग्य संधी

Gold rates | सोन्याचा दर प्रतितोळा 47783 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही 82 रुपयांची घसरण होऊन हा दर प्रतिकिलो 68281 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, दागिन्यांच्या खरेदीसाठी योग्य संधी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 10:44 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोन्याचा दर सातत्याने 47 हजार रुपये प्रतितोळा या पातळीच्या आसपास घुटमळताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर गुरुवारी सोन्याच्या दरात 106 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा 47783 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही 82 रुपयांची घसरण होऊन हा दर प्रतिकिलो 68281 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

मात्र, सोन्याची सध्याची वाटचाल पाहता आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी आत्ताच उत्तम संधी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)मध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 6,900 कोटी गुंतवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.

डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.

सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.