एफडीधारकांना अच्छे दिन; आरबीआयकडून नव्या वर्षात मोठं गिफ्ट, नव्या गाईडलाईन्स पाहिल्या का?

एक जानेवारीपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. अनेक नवे नियम नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून लागू होणार आहेत.

एफडीधारकांना अच्छे  दिन; आरबीआयकडून नव्या वर्षात मोठं गिफ्ट, नव्या गाईडलाईन्स पाहिल्या का?
EMI चे ओझे कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी पुन्हा पुन्हा बाजारात येतील. सध्या महागाई, विविध कराचे ओझे, नि वाढलेल्या व्याजदराने ग्राहकाचे हात बांधले गेलेले आहे. त्याची बचत होत नसल्याने तो बाजारातही खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.
| Updated on: Dec 31, 2024 | 8:38 PM

एक जानेवारीपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. अनेक नवे नियम नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून लागू होणार आहेत. ज्याचा मोठा परिणाम हा सामान्य खातेधारकांवर होणार आहे. तुम्ही जर फिक्स्ड जिपॉझिट अर्थ एफडी करण्याच्या विचारात असाल किंवा तुमची एफडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एफडीसंदर्भात आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नवी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.

कोणते नियम बदलणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या नियमानुसार आता जे छोटे गुंतवणूकदार आहेत, एफडीधारक आहेत, ते 10,000 रुपयापर्यंतची रक्कम तीन महिन्यांच्या आत कधीही काढू शकतात.मात्र त्यावर त्यांना व्याज मिळणार नाही.

मोठे एफडीधारकर हे बँकेत जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम किंवा पाच लाख रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला तीन महिन्याच्या आत काढता येईल, मात्र त्यावर कोणतंही व्याज मिळणार नाही.

जर काही गंभीर आजारांच्या उपचारासाठी तुम्हाला पैसे लागत असतील तर एफडीधारक हा एफडीची पूर्ण रक्कम बँकेतून काढू शकतो, मात्र त्याच्यावर त्याला कोणतंही व्याज मिळणार नाही.

तसेच तुमचा जर एफडीचा कालावधी पूर्ण होणार असेल तर बँकांना कमीत कमी दोन आठवडे आधी तुम्हाला त्याबाबत माहिती देणं बंधनकारक असणार आहे.

एफडीधारकाला जर आपला नॉमिनी बदलायचा असेल किंवा इतर काही बदल करायचे असतील तर त्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था तयार करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.ग्राहकांची ही कामं आता तातडीनं होणार आहेत. हे सर्व नियम एक जानेवारीपासून लागू होणार आहेत.

एफडीधारकांना फायदा 

दरम्यान आरबीआयच्या या नव्या गाईडलाईन्सचा एफडीधारकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अडचणीच्या काळात त्यांना आपला पैसा तातडीनं काढता येणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी आहेत. परंतु जर पैसा मध्येच काढला तर त्यावर व्याज देखील मिळणार नाहीये.