AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: पीएफच्या व्याजाचे पैसे खात्यात जमा, पैसे कसे काढाल?

EPFO | वैद्यकीय खर्चासाठी वेळी EPF मधून पैसे काढू शकता, परंतु ते वैद्यकीय बिल जमा केल्यानंतर उपलब्ध होते. त्याचवेळी, नवीन वैद्यकीय आगाऊ सेवा पूर्वीच्या प्रणालीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि तीन दिवसांऐवजी आता फक्त 1 तासात पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

EPFO: पीएफच्या व्याजाचे पैसे खात्यात जमा, पैसे कसे काढाल?
पीएफ अकाऊंट
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 04, 2021 | 11:13 AM
Share

नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी पीएफचे व्याज ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) च्या ग्राहकांना हस्तांतरित करणे सुरू केले आहे. तुम्हालाही सणापूर्वी पीएफचे पैसे काढायचे असतील तर आम्ही तुम्हाला पीएफ अॅडव्हान्स काढण्याची मुभा आहे. आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) एक लाख रुपये आगाऊ काढू शकता. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही हे पैसे काढू शकता.

वैद्यकीय खर्चासाठी वेळी EPF मधून पैसे काढू शकता, परंतु ते वैद्यकीय बिल जमा केल्यानंतर उपलब्ध होते. त्याचवेळी, नवीन वैद्यकीय आगाऊ सेवा पूर्वीच्या प्रणालीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि तीन दिवसांऐवजी आता फक्त 1 तासात पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

पीएफ खात्यातून पैसे कसे काढाल?

* यासाठी तुम्हाला सर्वप्रथम epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. * वेबसाइटच्या होम पेजवर उजव्या कोपर्‍यात सर्वात वरती ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेम वर क्लिक करा. * त्यानंतर unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा. * ऑनलाइन सेवांवर जा. यानंतर दावा फॉर्म 31, 19, 10 सी आणि 10 डी भरा. * तुमच्या बँक खात्यातील शेवटचे ४ अंक टाका आणि पडताळणी करा. * Proceed for Online claim वर क्लिक करा. * ड्रॉप डाऊनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडा. * पैसे काढण्याचे कारण निवडा. रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा. मग तुमचा पत्ता टाका. * Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका. * हे तुमचा दावा दाखल करेल. एका तासात तुमच्या खात्यात पीएफ क्लेमचे पैसे येतील.

पीएफ खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर काय कराल?

आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळालेले नसून लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. वास्तविक, व्याजाची रक्कम झोननिहाय क्रेडिट असल्याने, अनेक वेळा वेगवेगळ्या झोनमध्ये पैसे जमा होण्यास वेळ लागतो. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला सरकारने यापूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता. या निर्णयाला कामगार मंत्रालयानेही संमती दिली होती. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची ईपीएफ बॅलन्स देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

इतर बातम्या:

पोस्टाच्या योजनेत पैसे डबल होणार, 2 लाख रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवेळी 4 लाख मिळवा

EPFO Alert: नोकरी सोडल्यानंतर घरबसल्या ईपीएफओला तारीख अपडेट कशी कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Petrol Diesel Price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?