AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : किती वेळा करु शकता आधार कार्ड अपडेट, माहिती आहे का?

Aadhaar Card : आधार कार्ड वेळोवेळी अपडेट केल्यास त्याचा दुरुपयोग होत नाही. तसेच त्याचा योग्य वापर ही होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, किती वेळा तुम्ही आधार कार्ड अपडेट करु शकता? तुम्ही इतक्या वेळा आधार कार्ड अपडेट करु शकता.

Aadhaar Card : किती वेळा करु शकता आधार कार्ड अपडेट, माहिती आहे का?
| Updated on: Jun 16, 2023 | 7:57 PM
Share

नवी दिल्ली : आधार (Aadhaar Card) आजच्या काळात अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. आधारकार्डची आवश्यकता अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी करण्यात येतो. त्यामुळे याविषयीच्या ज्या काही सूचना येतात, त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी नवीन निर्देश देते. आधार कार्डची एजन्सी UIDAI ने याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी नवीन माहिती दिली. त्यानुसार, आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आधार कार्ड अपडेट (Aadhar Update) करणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट करणे सोपे आहे.

myAadhaar पोर्टलवर अपडेट myAadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करता येते. ऑनलाईन पद्धतीने आधारकार्ड अपडेट करता येते. या 15 मार्च ते 14 जून 2023 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येते होते. आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. तरीही तुम्हाला आधार कार्ड केवळ 50 रुपयांमध्ये अपडेट करता येते.

कितीवेळा करता येते अपडेट आधार कार्ड आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी निश्चित मर्यादा आहे. तुमच्या नावात दोनदा बदल करता येतो. तर जन्मतारीख आणि लिंगामध्ये एकदाच बदल करता येतो. त्यामुळे ही माहिती भरताना, अपडेट करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

आधार-पॅन जोडणी प्राप्तिकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाहीत. बँकिंग व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो. मुदत संपल्यावर नागरिकांना ही संधी देण्यात येणार नाही.

पॅन कार्ड होईल निष्क्रिय या 30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी केली नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल. मुदतीनंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. अजूनही ज्यांनी या दोन्ही कार्डची जोडणी केली नाही, त्यांना एक हजार रुपये भरुन ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करता येईल.

MyAadhaar पोर्टलवर आधार असे अपडेट करा

  1. सर्वात अगदोर myaadhaar.uidai.gov.in वर जा
  2. आता लॉग इन करा. नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करण्याचा पर्याय निवडा
  3. त्यानंतर अपडेट आधारवर क्लिक करा
  4. पत्ता अपडेट करण्यासाठी, इतर माहिती अद्ययावत करण्याचा पर्याय निवडा
  5. स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा आणि डेमोग्राफिक डाट्याची माहिती अपलोड करा
  6. आता पेमेंट करा, त्यानंतर तुम्हाला Acknowledgement Number मिळेल
  7. हा क्रमांक सांभाळून ठेवा. स्टेट्स चेक करा
  8. आधार अपडेटसाठी 50 रुपये शुल्क लागेल
  9. तुम्ही आधार कार्डचा पत्ता अपडेट करणार असाल तर हे शुल्क अदा करावे लागेल

ही घ्या काळजी

  1. आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करता येतो
  2. नावात बदल करण्यासाठी ओळखपत्राची स्कॅन कॉपी लागेल
  3. जन्मतारीख अपडेट करण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची स्कॅन कॉपीची आवश्यकता
  4. लिंग बदल करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागत नाहीत
  5. ऑनलाइन SSUP पोर्टल, मोबाईल ॲपच्या सहायाने भाषा बदलता येते
  6. सध्या या पोर्टलवर एकूण 13 भाषा आहेत

दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!.
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल.
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला.
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला.
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद.
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात.
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात.
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार.
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी.