AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिना टच, बिना OTP… तुमचं ATM कार्ड पाकिटातूनही होऊ शकतं चोरी ! कसं ?, हे वाचाच

सायबर आणि डिजिटल फसवणूक ही आता केवळ स्क्रीनवर घडणारी गोष्ट राहिलेली नाही. कार्ड हातात घेतल्याशिवाय त्याचा डेटा चोरणं आता शक्य झालं आहे. त्यामुळे काळजी घेणं आणि योग्य खबरदारी बाळगणं ही तुमचीच जबाबदारी आहे.

बिना टच, बिना OTP… तुमचं ATM कार्ड पाकिटातूनही होऊ शकतं चोरी ! कसं ?, हे वाचाच
| Edited By: | Updated on: May 10, 2025 | 3:59 PM
Share

तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय, तितकंच त्याचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांचे प्रकारही वाढत आहेत. आता फसवणुकीसाठी केवळ फोन कॉल, OTP किंवा लिंक पाठवूनच नव्हे, तर तुमच्या नकळत अगदी गर्दीतून जातानाही तुमचं आर्थिक गोपनीयता धोक्यात येऊ शकते. विशेषतः डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी ही माहीती महत्वाची आहे. कारण आता अशी एक आधुनिक फसवणूक पद्धत समोर आली आहे, जिच्याद्वारे तुमच्या पाकिटात असलेल्या कार्डमधील डेटा सहज चोरता येतो तोही केवळ RFID स्कॅनिंग नावाच्या छोट्याशा तंत्रज्ञानाच्या मदतीने !

कसे होतात हे स्कॅम?

आजकाल बहुतेक बँका NFC (Near Field Communication) तंत्रज्ञान असलेली कार्ड्स देतात, ज्यामुळे कार्ड स्वाइप करण्याऐवजी ‘टॅप’ केल्यावरच पेमेंट होते. हे तंत्रज्ञान जरी वापरण्यास सोयीचं असलं, तरी त्यातच धोका दडलेला आहे. RFID स्कॅनर नावाचं छोटंसं डिव्हाइस स्कॅमर्सकडे असतं. हे डिव्हाइस फक्त काही सेंटीमीटर अंतरावरून तुमचं कार्ड स्कॅन करू शकतं आणि त्यातून महत्त्वाचा डेटा उचलू शकतं तेही तुमच्या नकळत!

उदाहरणार्थ, तुम्ही बस, ट्रेन किंवा मॉलमध्ये गर्दीत उभे आहात. कोणी तुमच्याजवळून जातं आणि त्यांच्या हातात RFID स्कॅनर असतं काही सेकंदातच तुमचं कार्ड स्कॅन केलं जातं, आणि तुमची माहिती चोरी जाते. नंतर ही माहिती वापरून ‘क्लोन कार्ड’ तयार केलं जातं आणि व्यवहार केले जातात.

मग बचाव कसा कराल?

1. RFID प्रोटेक्शन असलेली पाकीट वापरा : बाजारात आता अशा प्रकारची पाकीटं मिळतात जी स्कॅनिंग सिग्नल ब्लॉक करतात.

2. घरगुती उपाय : ॲल्युमिनियम फॉइल , विशेष पाकीट नसल्यास, कार्ड ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा. यामुळे स्कॅनरचा सिग्नल आत पोहोचत नाही.

3. NFC सुविधा बंद करा : काही कार्ड्समध्ये NFC ऑन/ऑफ करण्याची सुविधा असते. ती बंद ठेवा, जेव्हा गरज असेल तेव्हाच चालू करा.

4. गर्दीत सतर्क राहा : गर्दीच्या ठिकाणी तुमचं पाकीट/बॅग जिथे कार्ड ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी कोणाचाही संशयास्पद स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.