AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ

ATM charge | RBI ने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके केले आहे. तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहे.

मोठी बातमी: ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ
ATM rules 2021
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 21, 2021 | 2:56 PM
Share

मुंबई: हल्लीच्या काळात अनेकजण प्रत्यक्ष बँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा एटीएममधून पैसे काढण्याला प्राधान्य देतात. याासाठी आतापर्यंत विशेष शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केल्यामुळे इंटरचेंज शुल्क वाढले आहे. परिणामी आर्थिक व्यवहारांवर जादा शुल्क आकारले जाणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

RBI ने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके केले आहे. तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहे. RBI च्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विनाशुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.

इंटरचेंज शुल्क म्हणजे काय?

क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून जे शुल्क आकारले जाते त्याला इंटरचेंज शुल्क म्हणतात. एखाद्या ग्राहकाने स्वत:ची बँक सोडून अन्य बँकेच्या एटीएमचा वापर करुन पैसे काढले तर ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातात, ती मर्चंट बँक असते.

याशिवाय, पुढील वर्षापासून ग्राहक शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे. बँकांना उच्च इंटरचेंज शुल्काची भरपाई करता यावी, यासाठी ग्राहक शुल्कात वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. याशिवाय, आयसीआयसीआय बँकेकडून रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

डेबिट कार्डाशिवाय पैसे काढा

आयसीआयसीआय बँकेकडून काही दिवसांपूर्वीच एक नवी सुविधा सुरु करण्यात आली होती. त्यासाठी आपल्याला आयसीआयसीआय बँक एटीएम(ICICI Bank ATM)वर जावे लागेल. तिथे तुम्हाला ‘Cardless Withdrawal’वर क्लिक करावे लागेल आणि नंतर ‘Mobile Number’ लिहा आणि ‘Reference number’, ‘Temporary PIN’, ‘Amount’ आदि माहिती भरावी लागेल. Reference number साठी आपल्याला मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर जावे लागेल. येथे, ‘Cardless Cash Withdrawal’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, एक पिन प्रविष्ट करावा लागेल. यानंतर एक Reference number तयार होईल, त्या आधारावर आपण पैसे काढू शकता. आपल्याला एटीएममध्ये हा Reference number प्रविष्ट करावा लागेल.

संबंधित बातम्या:

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, एटीएममध्ये जाण्याआधी जाणून घ्या नवा नियम

ICICI आणि SBI कडून कार्डलेस सुविधा सुरु, पैसे कसे काढणार?

ATM मधून बाहेर पडण्याअगोदर चेक करा बॅलन्स, ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बसतोय एवढा भुर्दंड!

Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?