AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holiday Loan | परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी कर्ज हवंय, तर या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष नको

Holiday Loan | देश-विदेशात फिरण्यासाठी आणि सुट्टी घालवण्यासाठी तुम्ही ही कर्ज घेऊ शकता. त्यासाठी या गोष्टींची खबरदारी मात्र घ्या.

Holiday Loan | परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी कर्ज हवंय, तर या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष नको
कर्ज घेताना बजेट ठरवाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 04, 2022 | 5:47 PM
Share

Holiday Loan | परदेशात सुट्टी घालवण्याचा प्लॅन (Vacation Plan) आखताय. विदेशात जाण्यासाठी खर्चाचं नियोजन करताय. तर चिंता सोडा, बॅग पॅक करा. कारण देशातील अनेक मोठ्या बँका आणि वित्तीय संस्था तुमचे हे स्वप्न पूर्ण करु शकतात. पर्सनल हॉलिडे लोन (Personal Holiday Loans) ही नवीन योजना बाजारात आली आहे. या कर्जाच्या मदतीने तुम्ही भरपूर भटकंती करु शकता. जग फिरु शकता आणि जगातील सुंदर जागा डोळ्यात साठवू शकता. अनेक बँका (Bank) 40 लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा करतात.त्यासाठी 10.75 टक्के व्याज आकरल्या जाते. तुम्हीही या कर्जासाठी अर्ज करणार असाल तर काही महत्वाच्या बाबी लक्षात घ्या.

बजेट अगोदर ठरवा

विदेशात फिरायचं तर मोठं बजेट लागेल.  पण त्यात काय काटकसर करता येईल.  तेही बघा.   नाहकचा वायफळ खर्च, नाहकची खरेदी टाळा. बजेट ठरवा. त्यानुसारच कर्जासाठी अर्ज करा.   हिशोब काटेकोर पाळा.   नाहीतर कर्जापेक्षाही खर्च जास्त होईल.

अनेक चांगल्या ऑफर्स

अनेक बँका आणि वित्तीय संस्था फिरण्यासाठी चांगल्या ऑफर्स देतात.   ट्रॅव्हल लोन स्कीममध्ये भुरळ घालणाऱ्या ऑफर असतात.   त्यातील फायदे तोटे समजूनच त्या खरेदी करा.  बजेट तपासा.   त्यापेक्षा जास्त खर्च होत असेल तर या ऑफर्सच्या प्रेमात पडू नका.

कर्ज परतफेड कालावधी बघा

हॉलिडे कर्ज परतफेड योजना कमी कालावधीची असावी. 12 ते 60 महिने कालावधीची कर्ज परतफेड सर्वात चांगली मानण्यात येते. याचा अर्थ 1 ते 5 वर्षाच्या कालावधीत तुम्ही कर्ज परतफेड करता.

ईएमआय जास्त हवा

पाच वर्षांसाठी कर्ज घेतलं, तरी त्यावर अधिक व्याज द्यावे लागते. ही बाब लक्षात ठेवा. त्यामुळे कर्जाचा कालावधी शक्यतो कमी ठेवा. त्यामुळे ईएमआयसाठी (EMI)जादा तरतूद करावी लागेल. पण व्याजावर होणारा खर्च वाचेल.

क्रेडिट स्कोअर तपासा

क्रेडिट स्कोअर तीन अंकी असते. कर्जासाठी अर्ज करताना अगोदर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा. या स्कोअरवरुन तुमची कर्ज परफेडीची क्षमता तपासण्यात येते.

तर दुसऱ्यावेळी कर्ज विसरुन जा

तुम्ही वैयक्तिक कर्जाची परतफेड केली नाही तर यावेळी तुम्ही निसटून जाल. पण आर्थिक निकड आल्यास पुढील वेळी तुम्हाला कोणतीच बँक, वित्तीय संस्था उभी करणार नाही. क्रेडिट हिस्ट्रीमध्ये ही फसवणूक समोर येईल.

कर्ज घ्यायचे की नाही ते ठरवा

कर्ज घ्यावेच असे नाही. तुमचा प्लॅन वर्कआऊट होत असेल तर तो राबवा. कमी खर्चातही फिरता येते. कर्ज घेताना निश्चित राशी आणि त्यावर थोडा अतिरिक्त खर्च लक्षात घेऊन बजेट प्रमाणे टूर आखा.

सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.