SBI कार्डावरून शॉपिंग करताय आणि सामान चोरीला गेले तर पैसे परत मिळणार

SBI card | चोरी किंवा घरफोडीत सामान चोरीला गेल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे परत मिळतात. तुम्ही एसबीआयच्या कार्डावरुन खरेदी केलेल्या गोष्टींसाठी हा इन्शुरन्स लागू असतो.

SBI कार्डावरून शॉपिंग करताय आणि सामान चोरीला गेले तर पैसे परत मिळणार
एसबीआय कार्ड

मुंबई: अलीकडच्या काळात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहेत. बहुतांश लोक खरेदी करताना कार्डाच्या माध्यमातूनच पैसे भरताना दिसतात. डिजिटल सुविधेमुळे तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. एसबीआयच्या डेबिट कार्डावरुन शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स मिळतो. हा नियम फारच कमी लोकांना माहिती आहे.

एसबीआयच्या माहितीनुसार, चोरी किंवा घरफोडीत सामान चोरीला गेल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे परत मिळतात. तुम्ही एसबीआयच्या कार्डावरुन खरेदी केलेल्या गोष्टींसाठी हा इन्शुरन्स लागू असतो. एसबीआय कार्डाचा वापर करुन खरेदी केलेली वस्तू 90 दिवसांमध्ये चोरीला गेली तर तुम्ही इन्शुरन्स क्लेम करु शकता.

एसबीआयच्या या विम्याच्या माध्यमातून तुम्हाला एक लाखापर्यंतची नुकसानभरपाई मिळू शकते. 5 हजारापासून एक लाखापर्यंत तुम्हाला डेबिट कार्डानुसार इन्शुरन्स कव्हर मिळतो. SBI Gold, SBI Platinum, SBI प्राईड, SBI प्रीमियम आणि एसबीआय सिग्नेचर या डेबिट कार्डांमध्ये या सुविधेचा समावेश होतो.

SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं

SBI मध्ये खाते असल्यास तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदी डिस्काउंट मिळू शकते. स्टेट बँक आणि इंडियन ऑईल यांनी एकत्रितपणे RuPay डेबिट कार्ड लाँच केले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीसाठी या कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना लाभ मिळू शकतो.

SBI चे हे कार्ड कॉन्टॅक्टलेस असेल. त्यामुळे हे कार्ड स्वाईप न करता पेट्रोल पंपावर तुमच्या खात्यातील पैसे वळते होतील. तुम्ही गाडीत जेवढ्या किंमतीचे पेट्रोल किंवा डिझेल भराल त्याच्या 0.75 टक्के रिवॉर्ड पॉईंट तुम्हाला मिळतील. या रिवॉर्ड पॉईंटसचा वापर तुम्ही हॉटेल्स, सिनेमागृह किंवा कोणत्या बिलाचे पैसे भरण्यासाठी वापरु शकता.

संबंधित बातम्या:

एसबीआय ग्राहक स्मार्टफोनला असे बनवू शकता क्रेडिट कार्ड! फोन दाखवताच कापले जातील पैसे

एसबीआय कार्डने फॅब इंडियासोबत लाँच केले कॉन्टॅक्टलेस को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, गिफ्ट व्हाउचरसह मिळतील हे फायदे

SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI