रेल्वे स्टेशनवर स्क्रीनिंगवेळी शरीराचे तापमान जास्त असल्यास पाठवणार घरी; रिझर्व्हेशनचे पैसे परत मिळणार

Railway Booking | रेल्वे तिकीट बुक केल्यानंतरही प्रवाशी अनफिट असल्यास त्यांना थेट घरी पाठवले जात आहे. रेल्वेकडून अशा प्रवाशांच्या तिकीटाचे पैसेही परत केले जात आहेत.

रेल्वे स्टेशनवर स्क्रीनिंगवेळी शरीराचे तापमान जास्त असल्यास पाठवणार घरी; रिझर्व्हेशनचे पैसे परत मिळणार
रेल्वे स्थानकांवर स्क्रीनिंग
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 12:56 PM

मुंबई: देशातील कोरोनाची दुसरी साथ नियंत्रणात आली असली तरी रेल्वे प्रशासनाकडून अजूनही प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. सध्या रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवासासाठी सोशल डिस्टन्सिंगचे अनेक नियम आखून दिले आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे स्क्रीनिंग केले जात आहे. त्यानंतर शरीराचे तापमान योग्य असेल तरच प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. (Railway passanger may get full refund of reservation if they unable to travel due unfit)

रेल्वे तिकीट बुक केल्यानंतरही प्रवाशी अनफिट असल्यास त्यांना थेट घरी पाठवले जात आहे. रेल्वेकडून अशा प्रवाशांच्या तिकीटाचे पैसेही परत केले जात आहेत. त्यासाठी प्रवासाच्या दिवसापासून 10 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला टीडीआर फाईल करावा लागेल. त्यानंतर टीटीई सर्टिफिकिटी सादर करुन प्रवाशी आपले पैसे परत मिळवू शकतात.

काय आहेत रेल्वेचे नियम?

तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर स्क्रीनिंगमध्ये अनफिट आढळलात तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही. तुम्ही कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेरगावी जाणार असाल. मात्र, रेल्वे स्थानकात गेल्यावर तुमच्यापैकी एकजण स्क्रीनिंगमध्ये अनिफट आढळला तर सर्व लोकांचे पैसेही रिफंड मिळू शकतात.

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

गेल्या गणेशोत्सवात कोकणात जायला न मिळालेल्या चाकरमन्यांनी यंदा सुरुवातीपासूनच गावी जाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात (Konkan) जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच फुल्ल झाले आहे.रेल्वेने 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती दिली आहे. काही अपवादात्मक गाड्यांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या तरीही उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाड्यांना शेकडोंच्या घरात प्रवासी वेटिंगवर आहेत. तर परतीच्या प्रवासासाठीही 14 तारखेपासून पुढील सहा -सात दिवसांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असल्यामुळे शहरातील लोकांना कोकणात जाण्यास मज्जाव करण्याला आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी आणि 14 दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला होता. मात्र, यंदा चाकरमन्यांनी ही कसर भरून काढायचे ठरवले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांसाठी आतापासूनच बुकिंग होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ, कोरोनाबळींचा आकडा मात्र घटला

मुंबई महापालिकेचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू आणि नोकरदारांसाठी आनंदाची बातमी

(Railway passanger may get full refund of reservation if they unable to travel due unfit)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.