Indian Railways: मालवाहतुकीतून रेल्वेने कमावला बक्कळ पैसा, सप्टेंबरमध्ये 10,815 कोटींचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न

Indian Railway | या कालावधीत, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 10,815.73 कोटी रुपयांची कमाई केली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.19 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी गेल्यावर्षी याच कालावधीत रेल्वेला मालवाहतूक करुन 9,905.69 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

Indian Railways: मालवाहतुकीतून रेल्वेने कमावला बक्कळ पैसा, सप्टेंबरमध्ये 10,815 कोटींचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न
रेल्वे

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात प्रवासी वाहतूक बराच काळ बंद असूनही रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्नाची भरपाई केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे सध्या रेल्वेला ‘अच्छे दिन’ आले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये रेल्वेचे मालवाहतूक लोडिंग गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 3.62 टक्के जास्त होते. रेल्वेने ही माहिती दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात रेल्वेने 106 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. गेल्यावर्षी याच कालावधीत हे प्रमाण 102.3 दशलक्ष टन होते. त्यामुळे यंदा यामध्ये 3.62 टक्क्यांची भर पडली आहे. मालवाहतूक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून संबंधित ग्राहकांना अनेक सवलती देखील दिल्या जात आहेत.

या कालावधीत, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 10,815.73 कोटी रुपयांची कमाई केली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.19 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी गेल्यावर्षी याच कालावधीत रेल्वेला मालवाहतूक करुन 9,905.69 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

कोळशाची विक्रमी वाहतूक

भारतीय रेल्वेने यावर्षी आतापर्यंत 30.9 दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली आहे, जी गेल्या वर्षी 24 दशलक्ष टन होती. गेल्या वर्षी 1.4 दशलक्ष टनांच्या तुलनेत रेल्वे सध्या दररोज 15.9 लाख टन कोळसा वाहतूक करत आहे. सप्टेंबरमध्ये वाहतूक झालेल्या महत्त्वाच्या वस्तूंमध्ये 47.74 दशलक्ष टन कोळसा, 11.24 दशलक्ष टन लोह खनिज, 6.46 दशलक्ष टन अन्नधान्य, 4.19 दशलक्ष टन खते, 3.60 दशलक्ष टन खनिज तेल, 6.15 दशलक्ष टन सिमेंट (क्लिंकर वगळता) यांचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेची चांदी; भंगार विकून कोट्यवधींची कमाई

गेल्यावर्षी कोरोनाकाळात भारतीय रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले होते. नव्या वर्षातही रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून घसघशीत उत्पन्न मिळवले आहे. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी उत्तर रेल्वेने भंगारच्या विक्रमी विक्रीतून 227.71 कोटी रुपयांची कमाई केली, अशी माहिती उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आशुतोष गांगल यांनी दिली. गेल्या याच कालावधीत मिळवलेल्या 92.49 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा हे 146% जास्त आहे.

रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिनं, त्यांच डब्बे अशा गोष्टींचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्याप्रमाणावर भंगार निघते. भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलावप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. रेल्वे खात्याने 2021-22 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 4100 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

संबंधित बातम्या:

Indian Railways: आता ट्रेन्स डिझेल नव्हे तर ‘या’ नव्या इंधनावर धावणार, वर्षाला 2.3 कोटींची बचत

रेल्वे 500 पेक्षा अधिक गाड्या बंद करणार? प्रवासी संख्येतील घट आणि तोट्यामुळे मोठा निर्णय!

भारतीय रेल्वेसोबत करा ‘हा’ व्यवसाय, कमी भांडवल गुंतवूनही व्हाल मालामाल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI