भारतीय रेल्वेसोबत करा ‘हा’ व्यवसाय, कमी भांडवल गुंतवूनही व्हाल मालामाल

Indian Railway | भारतीय रेल्वे दरवर्षी 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची उत्पादने खरेदी करते. आपण रेल्वेला त्यांच्या गरजेनुसार उत्पादने पुरवून चांगली कमाई करु शकता. रेल्वेसोबत व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल.

भारतीय रेल्वेसोबत करा 'हा' व्यवसाय, कमी भांडवल गुंतवूनही व्हाल मालामाल
भारतीय रेल्वे

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता देशभरातील रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. मध्यंतरी ठप्प असलेल्या गाड्या आता पुन्हा एकदा ट्रॅकवर धावत आहेत. रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर व्यवसायाच्या संधीही वाढल्या आहेत. जर तुम्ही सुद्धा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण भारतीय रेल्वेमध्ये सामील होऊन फायदेशीर व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही रेल्वेला उत्पादने विकून कमावू शकता.

वास्तविक, भारतीय रेल्वे दरवर्षी 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची उत्पादने खरेदी करते. आपण रेल्वेला त्यांच्या गरजेनुसार उत्पादने पुरवून चांगली कमाई करु शकता. रेल्वेसोबत व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. तुम्ही https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकता.

व्यवसायाची संधी कशी मिळवा?

मेक इन इंडिया धोरणांतर्गत, केवळ 50 टक्क्यांहून अधिक स्थानिक उत्पादने असलेले पुरवठादार रेल्वे वॅगन, ट्रॅक आणि एलएचबी कोचच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. त्याचवेळी, ‘वंदे भारत’ ट्रेन संचासाठी 75 टक्के इलेक्ट्रिक वस्तू मेक इन इंडिया अंतर्गत खरेदी केल्या जातील.

बाजारात सर्वात स्वस्त वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून रेल्वे कोणतेही उत्पादन खरेदी करते. अशा परिस्थितीत, तुम्हाला असे उत्पादन शोधावे लागेल जे तुम्हाला कोणत्याही कंपनी किंवा बाजारातून सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळेल. तुमच्या खर्च आणि नफ्याच्या आधारावर निविदा दाखल करता येईल. तुमचे दर स्पर्धात्मक असले पाहिजेत तरच तुम्हाला निविदा मिळवणे सोपे होईल.

काय सूट मिळणार?

रेल्वे लहान उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांना रेल्वेच्या कोणत्याही टेंडरच्या खर्चाच्या 25 टक्के खरेदीमध्ये 15 टक्के पर्यंत प्राधान्य मिळते. याशिवाय, लघू उद्योगांसाठी ईएमडी आणि सिक्युरिटी डिपॉझिट जमा करण्याच्या अटी शिथिल केल्या आहेत.

नोंदणीची गरज नाही

जर पुरवठादार रेल्वेच्या कोणत्याही एका एजन्सीमध्ये उत्पादनाच्या पुरवठ्यासाठी नोंदणी करतो, तर ते संपूर्ण रेल्वेमध्ये उत्पादनाच्या पुरवठ्यासाठी नोंदणी म्हणून मानले जाईल. नवीन नोंदणीची आवश्यकता राहणार नाही. एकदा नोंदणी करून, आपण रेल्वेसह व्यवसाय सुरू करू शकता.

संबंधित बातम्या:

वंदे भारत ट्रेनमध्ये लवकरच नव्या सुविधा; पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर आणखी कोणते बदल होणार?

वेगवान भारतासाठी पंतप्रधान मोदींची 100 लाख कोटींची योजना, जाणून घ्या काय फायदा होणार?

फिक्स्ड डिपॉझिटच्या दहापट फायदा, जाणून घ्या काय आहे गुंतवणूकदारांना मालामाल करणारी स्कीम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI