चांगला परफॉमर्न्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘ही’ कंपनी देणार मर्सिडीज कार

HCL | एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनी चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्याला Mercedes Benz कार देण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी संचालक मंडळासमोर ठेवला जाईल.

चांगला परफॉमर्न्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'ही' कंपनी देणार मर्सिडीज कार
मर्सिडीज कार

मुंबई: कोरोना संकटात अनेक क्षेत्रांमधील रोजगाराचे तीनतेरा वाजले असले तरी माहिती व तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कंपन्यांची वेगवान घोडदौड सुरु आहे. हा काळ म्हणजे आयटी कंपन्यांसाठी एकप्रकारे इष्टापत्ती ठरताना दिसत आहे. या क्षेत्रातील मागणीत वाढ झाल्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धाही पाहायला मिळत आहे.

या सगळ्यात चांगले कर्मचारी आपल्या कंपनीत राहावेत यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक आमिषं दाखवली जात आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनी चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्याला Mercedes Benz कार देण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी संचालक मंडळासमोर ठेवला जाईल. यापूर्वी HCL ने 2013 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या 50 कर्मचाऱ्यांना Mercedes Benz कार दिल्या होत्या.

यासंदर्भात बोलताना एचसीएल टेक्नॉलॉजीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अप्पाराव व्ही.व्ही. यांनी सांगितले की, नव्या नोकरभरतीसाठी 15 ते 20 टक्के अधिक खर्च होतो. त्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांनाच नव्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. तुम्हाला एखाद्या डेव्हलपरची भरती करायची असेल तर तो सहज मिळून जातो. मात्र, क्लाउड प्रोफेशनलच्या पदावरील व्यक्तीसाठी कंपनीला जास्त खर्च करावा लागतो, असे अप्पाराव व्ही.व्ही. यांनी म्हटले.

22 हजार नोकऱ्या देणार

एचसीएल टेक्नॉलॉजीने यंदाच्या आर्थिक वर्षात 22 हजार पदांची भरती करण्याची योजना आखली आहे. गेल्यावर्षी कंपनीने 15600 नवख्या कर्मचाऱ्यांना संधी दिली होती. याशिवाय, विद्यमान कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ आणि प्रोत्साहन भत्ता दिला जात असल्याचे अप्पाराव व्ही.व्ही. यांनी सांगितले.

इतर बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI