AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करदात्यांना दिलासा; मार्चमध्ये शनिवारी प्राप्तिकर कार्यालये उघडी राहणार

मुख्य प्राप्तिकर आयुक्तांसह त्यांच्या समकक्ष सर्व कार्यालये या महिन्यात शनिवारी सुद्धा उघडी राहतील. या 12 मार्च पासून या नियमांचे पालन होईल.

करदात्यांना दिलासा; मार्चमध्ये शनिवारी प्राप्तिकर कार्यालये उघडी राहणार
Nirmala sitaraman
| Updated on: Mar 12, 2022 | 9:40 AM
Share

मुंबई : करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राप्तिकर खात्याने (Income Tax Department) सक्रियपणे आणि सक्षमपणे समोर यावे यासाठी अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमन यांनी तंबी दिली आहे. सतत तक्रार करुनही अधिकारी दखल देत नसल्याचे समोर आल्यानंतर अर्थमंत्र्यांनी हा पर्याय निवडला. आता करदात्यांचे समाधान करण्यासाठी प्राप्तिकर खात्याची कार्यालये दर शनिवारी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिका-याने याविषयीची माहिती दिली. सीबीडीटी आणि सीबीआयसी (CBDT And CBIC) यांच्या बंगळुरु येथे एक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात अर्थमंत्र्यांनी अधिका-यांचा क्लास घेतला. करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी सक्रियपणे सहभाग घेत नसल्याबद्दल त्यांनी कान टोचले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हे प्राप्तीकर खात्याचे अग्रगण्य धोरण निर्मिती करणारे मंडळ आहे. तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ हे सीमा शुल्क केंद्रीय उत्पन्न शुल्क अथवा वस्तू आणि सेवा कर विभागासाठीचे एक महत्वपूर्ण प्राधिकरण आहे.

मार्च महिन्यासाठी लागू असतील नियम एका वरिष्ठ अधिका-याने पीटीआयला-भाषा यांना दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्राप्तिकर आयुक्तांसह त्यांच्या समकक्ष सर्व कार्यालये या महिन्यात शनिवारी सुद्धा उघडी राहतील. या 12 मार्च पासून या नियमांचे पालन होईल. तसे पाहता प्रत्येक शनिवार आणि रविवार हा प्राप्तिकर खात्यासाठी सुट्टीचा दिवस असतो. मात्र आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी करदात्यांच्या समस्या आणि तक्रारी दूर करण्यासाठी ही सुट्टी रद्द करुन कार्यालये सुरु ठेवण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे या मार्च महिन्यात 3 अतिरिक्त दिवस कर्मचा-यांना काम करावे लागणार आहे. यामुळे करदात्यांच्या तक्रारींचा लवकर निपटारा होईल अशी आशा आहे.

1.86 लाख कोटी करदात्यांच्या खात्यात प्राप्तिकर खात्याने करदात्यांना परतावा स्वरुपात दिलेल्या रक्कमेची आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार, या आर्थिक वर्षात आतापर्यंत 2.14 कोटी करदात्यांना 1.86 लाख कोटी रुपये परतावा देण्यात आला आहे. यामध्ये 2020-21 मध्ये 35,296.86 कोटी रुपयांसाठी 1.74 कोटींचा परताव्याचा ही सहभाग आहे. प्राप्तिकर खात्याने याविषयी ट्विट केले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1 एप्रिल 2021 ते 7 मार्च 2022 या दरम्यान 2.14 कोटींहून अधिक करदात्यांना 1,86,677 कोटी रुपये परत केल्याची माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे. 2,11,76,025 प्रकरणात 67,442 कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा देण्यात आला तर 2,31,654 प्रकरणात कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

संबंधित बातम्या

नव्या सरकारसमोर बिकट वाट; खर्च, कर्ज आणि वित्तीय तूट भरुन काढण्याचे आव्हान

निवृत्तीनंतर हक्काचा आधार; तुम्हाला ‘ईपीएस’बद्दल माहितीये का?

पतीकडून पत्नीला मिळणाऱ्या गिफ्टवर कर लागतो का? जाणून घ्या गिफ्टवरील कराबाबतचे महत्त्वपूर्ण नियम

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.