AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar card हरवले आहे? चुकीचा उपयोग टाळण्यासाठी करा लॉक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट (Document) असते. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. आधार कार्ड केवळ एक ओळख पत्रच (Identity card) नाही तर तुम्हाला अनेक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते.

Aadhaar card हरवले आहे? चुकीचा उपयोग टाळण्यासाठी करा लॉक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आधार कार्ड Image Credit source: टीव्ही9
| Updated on: Mar 18, 2022 | 7:35 AM
Share

कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट (Document) असते. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. आधार कार्ड केवळ एक ओळख पत्रच (Identity card) नाही तर तुम्हाला अनेक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, शाळेत प्रवेशासाठी. बँकेमध्ये खाते ओपन करण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधारची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. विचार करा जर अशा परिस्थितीमध्ये तुमचे आधार कार्ड हरवले आणि त्याचा कोणी चुकीचा उपयोग करत असेल तर तुम्ही काय कराल? अशा परिस्थितीमधून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डला लॉक करू शकता. जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हाच आधार अनलॉक करा.

लॉक, अन लॉकची सुविधा

तुमचे आधार कार्ड हरवल्यास तुम्ही ते लॉक करू शकता. तुमचे आधार कार्ड हरवल्यास अनेकवेळा त्याचा चुकीच्या पद्धतीने उपयोग होण्याची शक्यता असते. आधार कार्ड हरवल्यास ते जर चुकीच्या व्यक्तीच्या हातात सापडल्यास संबंधित व्यक्ती आधार कार्डचा चुकीचा उपयोग करू शकतो, त्याचा मोठा फटका तुम्हाला बसण्याची शक्यता असते. म्हणूनच ‘यूआयडीएआय’च्या वतीने तुम्हाला आधार लॉक अनलॉकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु हे नेहमी लक्षात ठेवा की आधार कार्ड लॉक करण्यापूर्वी त्याची एक व्हर्चूअल प्रत काढून ठेवा ती पुढे तुम्हाला केवायसीसाठी लागते. मग चला तर पाहूयात आपण आधार कार्ड कसे लॉक करतात.

आधार कार्ड लॉक कसे कराल?

सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईट (https://uidai.gov.in) वर जावे तिथे My Aadhaar या पर्याची निवड करावी, तिथेचे तुम्हाला लॉक, अनलॉकचे पर्याय दिसतील लॉकचा पर्याय निवडावा तिथे तुमचा 12 अंकी आधार नंबर किंवा व्हर्चूअल आयडी भरा त्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेला कॅपचा कोड आणि ओटीपी टाका सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ओके वर क्लीक करा अशा पद्धतीने तुमचे आधार कार्ड लॉक होते. जर तुम्हाला तुमचे आधार परत अनलॉक करायचे असेल तर पुन्हा अशीच प्रक्रिया करावी

संबंधित बातम्या

शैक्षणिक कर्ज घ्यायचे आहे? त्यापूर्वी जाणून घ्या कर्ज बुडवल्यास काय होऊ शकते

20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

आता महागाईने महिन्याचे बजेट कोलमडणार; ‘HUL’ च्या साबण आणि चहाच्या किंमतीने आता तोंड पोळणार

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?