AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शैक्षणिक कर्ज घ्यायचे आहे? त्यापूर्वी जाणून घ्या कर्ज बुडवल्यास काय होऊ शकते

शैक्षणिक कर्ज बुडवल्यास विद्यार्थी आणि सहकर्जदार या दोघांचाही क्रेडिट स्कोअर खराब होतो. त्यामुळे नवीन कर्ज मिळणं दुरापास्त होते. त्यासोबतच तारण म्हणून ठेवलेली संपत्तीही जप्त होते. शैक्षणिक कर्जाची परफेड न केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

शैक्षणिक कर्ज घ्यायचे आहे? त्यापूर्वी जाणून घ्या कर्ज बुडवल्यास काय होऊ शकते
शैक्षणिक कर्ज बुडवल्यास काय होऊ शकते?
| Updated on: Mar 18, 2022 | 5:40 AM
Share

अनिलने शैक्षणिक कर्ज (Educational loan) घेऊन बीटेकपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरीही (Job) लागली. मात्र, लॉकडाऊन लागताच कंपनीनं ऑफर लेटर रद्द केलं. नोकरीही नाही, खिशात पैसाही नाही त्यामुळे अनिल कर्ज (loan) चुकवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे बँकेनं अनिलला दिवाळखोर घोषित केलं. दिवाळखोरीचा शिक्का फक्त अनिल याच्यावरच बसला नाही तर गॅरंटर असलेल्या व्यक्तीलाही बँकेनं दिवाळखोर म्हणून घोषित केलं. बँकेच्या निर्णयाचा परिणाम अनिलला सध्या जाणवणार नाही, मात्र भविष्यात ज्यावेळी कर्जाची गरज पडेल त्यावेळी कर्ज मिळणं दुरापास्त होईल. शैक्षणिक कर्जाची परतफेड न केल्यास कर्जदारासोबतच सहअर्जदारही अडचणीत सापडतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो. विद्यार्थी कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असल्यास सहअर्जदारालाच कर्ज फेडावं लागतं. कर्जाची परतफेड होत नसल्यास बँका कायदेशीर कारवाई करतात.

कर्ज बुडवल्यास कारवाई

4 लाखांपेक्षा कमी गहाण नसलेले कर्ज असल्यास कायदेशीर नोटीस पाठवून कारवाई करण्यात येते. वित्तीय संस्था बँक अकाऊंट सील करतात तसेच संपत्तीचीही विक्री करतात. साडेसात लाख रुपयांपर्यंत कर्ज असेल तर गहाण ठेवलेली रक्कम जप्त करण्यात येते. कर्ज थकित असल्यास एनपीए म्हणून घोषित केले जाते. देशात शेती आणि उद्योग याच्यानंतर शैक्षणिक कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. 2021 मधील स्टेट बँकर्स समितीच्या आकडेवारीनुसार दरवर्षी एक ते दोन टक्के शैक्षणिक कर्ज एनपीए होतात. 2016 मध्ये 7.29 टक्के शैक्षणिक कर्ज एनपीए होतं. 2018 मध्ये 8.10, 2019 मध्ये 8.30 टक्के आणि 2020 मध्ये 9.70 टक्के कर्ज एनपीए झालंय.

कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा आवश्य विचार करा

शैक्षणिक कर्ज बुडवल्यानंतर कर्जदार आणि गॅरंटरला भविष्यात कर्ज आणि क्रेडिट कार्डसारख्या सुविधा मिळत नाहीत. कर्ज बुडवल्यानंतर सीबील स्कोअरमध्ये कायमची नोंद होते. एका अहवालानुसार 20 ते 30 वर्षांच्या ग्राहकांचा सीबील स्कोअर सगळ्यात खराब आहे. म्हणजेच करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुणांची सुरुवात खराब क्रेडिट स्कोअरपासून होत आहे.ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे पंकज मठपाल याबाबत बोलताना म्हणतात चांगलं करिअर करण्यासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा आर्थिक जीवनासाठी मोठा फटका बसतो. शैक्षणिक कर्ज घेण्या अगोदरच महाविद्यालय, कोर्स आणि नोकरीची संधी याची पडताळणी करावी आणि नंतरच शैक्षणिक कर्ज घ्यावे की नाही ते ठरवावे.

संबंधित बातम्या

यूएस फेडरल रिझर्व्हकडून अखेर व्याज दरात वाढ; महागाई नियंत्रणासाठी पाऊल

गुंतवणूकदार मालामाल; 70 टक्के IPO मधून मिळाला चांगला परतावा

Russia Ukraine Crisis : युद्धाचा सर्वाधिक फटका अशिया खंडात भारताला बसणार, S&P ग्लोबल रेटिंग्सचा अंदाज

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.