LPG Cylinder: घरगुती सिलेंडर स्वस्तात मिळण्याची शक्यता, मोदी सरकार अनुदान देण्याच्या विचारात

LPG Gas | गेल्यावर्षी कोरोनाकाळात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने एलपीजीवर अनुदान देणे बंद केले होते. त्यावेळी सिलेंडरचा दर साधारण 581 रुपये होता. मात्र, आता हाच दर 884 रुपयांवर पोहोचला आहे. काही राज्यांमध्ये सिलेंडरवर अनुदान दिले जात असले तरी ते नाममात्र आहे.

LPG Cylinder: घरगुती सिलेंडर स्वस्तात मिळण्याची शक्यता, मोदी सरकार अनुदान देण्याच्या विचारात
एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढल्या असल्या तरी तुम्हाला गॅस बुकिंगवर बंपर ऑफर दिली जात आहे. नवरात्रीच्या दृष्टीने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये एलपीजी गॅस बुक केल्यावर तुम्ही 24 कॅरेट सोने जिंकू शकता. याची सुरुवात पेटीएमने केली आहे. पेटीएमने या ऑफरला नवरात्री गोल्ड ऑफर असे नाव दिले आहे. यासाठी तुम्हाला पेटीएमच्या 'बुक गॅस सिलेंडर' फीचरचा वापर करून बुकिंग करून ऑफरचा लाभ घ्यावा लागेल.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:43 PM

नवी दिल्ली: सामान्य माणसाचे किचन बजेट अवलंबून असणाऱ्या घरगुती सिलेंडरविषयी (LPG Cylinder) केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून घरगुती सिलेंडरवरील अनुदानाच्या रक्कमेचा फेरआढावा घेतला जात आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या माहितीनुसार, घरगुती सिलेंडरचा खप वाढवण्यासाठी त्याची योग्य किंमत किती असू शकते, यासंदर्भात सध्या सरकारी पातळीवर खल सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे. त्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेशिवाय इतर अनुदान देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. तसे घडल्यास सामान्यांना घरगुती सिलेंडर आणखी स्वस्तात उपलब्ध होऊ शकतो.

गेल्यावर्षी कोरोनाकाळात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने एलपीजीवर अनुदान देणे बंद केले होते. त्यावेळी सिलेंडरचा दर साधारण 581 रुपये होता. मात्र, आता हाच दर 884 रुपयांवर पोहोचला आहे. काही राज्यांमध्ये सिलेंडरवर अनुदान दिले जात असले तरी ते नाममात्र आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार एलपीजीची किंमत सामान्य लोकांना एलपीजी परवडेल, या पातळीपर्यंत आणण्यासाठी अनुदान देऊ शकते. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे वाढणारे दर पाहता इंधनाचे दर वाढू शकतात. त्यामुळे भविष्यात अनुदान देऊनही सामान्यांना त्याचा कितपत फायदा होईल, याबाबत अद्याप साशंकता आहे.

दसरा-दिवाळीपर्यंत एलपीजी आणखी महागणार?

ऑक्टोबरपासून गॅसच्या किंमतीमध्ये 70 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे. घरगुती गॅसच्या नवीन किमती 1 ऑक्टोबरपासून सरकार ठरवणार आहे. अशा परिस्थितीत ऑटो इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप केलेल्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) किंमती वाढतील. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कॉमन मॅनला इंधन दरवाढीचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक वायूच्या किंमती किती वाढणार?

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील. अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका आहे. 1 ऑक्टोबरपासून APM चा दर 3.15 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (mmBtu) इतका होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून 7.4 एएमबीटीयू इतकी होईल. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे. येत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

संबंधित बातम्या:

तुमच्या जुन्या एलपीजी सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, एवढे मोजावे लागतील पैसे

आता मिस्ड कॉल देऊन मिळवा एलपीजी कनेक्शन; जाणून घ्या संपूर्ण तपशील

खुशखबर ! एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी आता हवा तो वितरक निवडता येणार, सरकार करणार ‘हे’ मोठे बदल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.