Burger : तरुणाईचा फेव्हरिट बर्गर महागला, McDonald’s ची तिसऱ्यांदा दरवाढ

Burger : तरुणाईचा आवडता बर्गर तिसऱ्यांदा महागणार आहे.

Burger : तरुणाईचा फेव्हरिट बर्गर महागला, McDonald's ची तिसऱ्यांदा दरवाढ
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 11:22 PM

नवी दिल्ली : संपूर्ण जगावर महागाईचे (Inflation) संकट ओढावले आहे. सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) वाढल्याने महागाईत पुन्हा तेल ओतल्या गेले आहे. भारतातच नाही तर विकसीत राष्ट्रे पण महागाईने मेटाकुटीला आली आहेत. आता लहान मुलांपासून ते तरुणाईचा आवडता बर्गर (Burger) ही महागला आहे. आशियातील या देशात बर्गरच्या किंमती वाढल्याने खाद्यप्रेमी खट्टू झाले आहेत. भारतातही अनेक खाद्यपदार्थ प्रचंड महागले आहे.

जपानमधील मॅकडोनाल्डने बर्गरसह इतर वस्तूंच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या रेस्टॉरंट चेनमध्ये गेल्या 10 महिन्यात मॅकडोनाल्डाने तिसऱ्यांदा दरवाढ केली आहे. त्यामुळे खाद्यप्रेमी नाराज झाले असले तरी जीभेचे चोचले पुरविल्या जाणार आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मॅकडोनाल्डसची होल्डिंगची कंपनी जापान लिमिटेडने शुक्रवारी तिसऱ्यांदा दरवाढीची घोषणा केली. महागाई सातत्याने वाढत असल्याने त्याचा भार आता ग्राहकांवर पडणार आहे.  त्यांच्या खिशावर या दरवाढीचा बोजा पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, 16 जानेवारीपासून त्यांचा 80 टक्के मेन्यू महाग असेल. कच्चा माल, मजूर, वाहतूक आणि वीजेची वाढलेली किंमत यामुळे दरवाढ झाल्याचा कंपनीचा दावा आहे.

मॅकडोनाल्ड जपानने यापूर्वी दोनदा दरवाढ केली आहे. यावेळी तिसऱ्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वी मार्च आणि सप्टेंबर 2022 मध्ये किंमतीत वाढ केली होती. वर्षभरापूर्वी जपानमध्ये एका चीज बर्गरची किंमत 140 येन होती. ती वाढून आता 200 येन झाली आहे.

मॅकडोनाल्ड जपानचा सिग्नेचर बिग मॅक हॅमबर्गर 410 येन होता. या किंमतीत वाढ झाली आहे. आता 450 येन अशी किंमत आहे. 1 जापानी येन 62 पैशां इतका आहे. जपानमध्ये पुढील महिन्यात 4,000 पेक्षा जास्त खाद्यपदार्थ महाग होणार आहेत.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.