EPFO Interest : पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम, पीएफवर किती मिळेल वार्षिक व्याज?

EPFO Interest : ईपीएफओवरील व्याजदराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून व्याजदर सातत्याने घसरत आला आहे. पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम आहे. त्यामुळे पीएफवर किती वार्षिक व्याज मिळेल, यावर अंदाज बांधण्यात येत आहे.

EPFO Interest : पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम, पीएफवर किती मिळेल वार्षिक व्याज?
व्याजाचे गणित जुळणार?
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 11:20 AM

नवी दिल्ली : कर्मचारी निवृत्तीसाठी प्रोव्हिडंट फंडात (PF Deposit) रक्कम जमा करतात. दरवर्षी केंद्र सरकार या जमा केलेल्या रक्कमेवर व्याज जमा करते. ईपीएफ खात्यात (EPF Account) व्याजाची रक्कम जमा करण्यात येते. ईपीएफओवरील व्याजदराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून व्याजदर सातत्याने घसरत आला आहे. पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम आहे. त्यामुळे पीएफवर किती वार्षिक व्याज मिळेल, यावर अंदाज बांधण्यात येत आहे. एका अंदाजानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8 टक्के व्याज (PF Interest Rate) देऊ शकते. याविषयीचा निर्णय लवकरच होऊ शकतो.

ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाच्या संचालकांची बैठक या महिन्यात होणार आहे. ईपीएफओच्या सर्व विशेष निर्णय बोर्ड ऑफ ट्रस्टी घेतात. सूत्रांच्या निर्णयानुसार, निवृत्ती निधीचे नियोजन करणाऱ्या ईपीएफओ चालू आर्थिक वर्षासाठी पीएफवर व्याजदर निश्चित करण्यासाठी काम करत आहे. अनेक लोक बचतीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा (PPF) पर्याय निवडतात. या योजनेवर चांगले व्याज मिळते. पीपीएफवरील व्याजाचे निश्चितीकरण केंद्र सरकार करते. तिमाही आधारावर खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा होते.

यंदा, कोविड काळापेक्षा, रक्कम काढणाऱ्यांची संख्या प्रचंड घटली आहे. खातेदारांच्या पीएफ खात्यातील रक्कम यंदा वाढलेली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या रक्कमेवर व्याज दिल्यास केंद्र सरकारच्या खर्चात वाढ होऊ शकते. ईपीएफओला इक्विटीमधून जोरदार परतावा मिळण्याची आशा आहे. त्यामुळे यंदा ईपीएफओ 8.1 टक्के देण्याची घोषणा करु शकते. तर काहींच्या मते हा व्याजदर किंचित घसरु पण शकतो. हा व्याजदर 8 टक्के होऊ शकतो. पण केंद्र सरकारला निवडणुकांच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची नाराजी ओढावून घेणे नुकसानदायक ठरु शकते.

हे सुद्धा वाचा

ईपीएफच्या सीबीटीने मार्च 2022 मध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याज मंजूर केले होते. गेल्या चार दशकातील हा सर्वात नीच्चांकी व्याजदर आहे. 2016-17 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. 2017-18 मध्ये ईपीएफओवरील व्याजदर 8.55 टक्के, 2018-19 मध्ये व्याजदर 8.65 टक्के, 2019-20 मध्ये 8.5 तर 2020-21 मध्ये व्याजदर 8.5 टक्के होते.

EPFO ने डिसेंबर 2022 मध्ये 14.93 लाख नवीन सदस्य जोडले. गेल्या वर्षी याच कालावधीत जोडलेल्या नवीन सदस्य संख्येपेक्षा हा आकडा दोन टक्क्यांनी अधिक आहे. कामगार मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे. ईपीएफओतर्फे हे नवीन आकडे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये सदस्य संख्येत 14.93 लाखांची वाढ झाली आहे.

कामगार मंत्रालयानुसार, डिसेंबर 2021 पेक्षा डिसेंबर, 2022 मध्ये ईपीएफओ सदस्यांची संख्या 32,635 हून अधिक वाढली आहे. या तुलनेनुसार, देशात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे सूचित होते. कामगार मंत्रालयानुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) आकड्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये ईएसआयसीसोबत नवीन 18.03 लाख कर्मचारी जोडल्या गेले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.