नवी दिल्ली : जर तुम्ही पण पीएफ खात्यातून (PF Account) वारंवार पैसे काढत असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठीच आहे. केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रोव्हिडेंट फंडांसंबंधीच्या नियमांत बदल केला आहे. या नवीन नियमानुसार, भारतीय भविष्य निर्वाह निधीत (EPFO) नोंदणी करणाऱ्या सदस्यांना त्याचा फायदा होईल. सदस्यांना पाच वर्षे पूर्ण झाले नाही आणि त्याला त्याच्या खात्यातून रक्कम काढायची असेल तर त्याला कर द्यावा लागेल. पण जर त्याने पाच वर्षानंतर पीएफ खात्यातून रक्कम काढली तर त्याच्या खात्यातून टीडीएस (TDS) कपात होणार नाही. तर वर्षाला 2.50 लाख रुपयांहून अधिक पीएफ योगदान जमा होत असेल तर त्यावर कर द्यावा लागणार नाही.