AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशावर शोककळा; आज महाराष्ट्रात सुट्टी मध्यवर्ती बँकेनुसार आज होणार नाहीत ही कामे

रविवारी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. देशावर शोककळा पसरली. देशात दुखवटा पाळण्यात येत आहे. या घटनेमुळे 7 फेब्रुवारी रोजी सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्याप्रमाणे ही कामे होऊ शकणार नाहीत

देशावर शोककळा; आज महाराष्ट्रात सुट्टी मध्यवर्ती बँकेनुसार आज होणार नाहीत ही कामे
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 10:06 AM
Share

रविवारी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. देशावर शोककळा पसरली. देशात दुखवटा पाळण्यात येत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांच्या कारकिर्दीत लता दिदींच्या सुरांनी भारतासह जगाला मोहिनी घातली. त्यांच्या जाण्याने सूर पोरके झाले. संगीत क्षेत्राचीच नव्हे तर राष्ट्राची अपरिमीत हानी झाली. या घटनेमुळे 7 फेब्रुवारी रोजी सरकारने सुट्टी जाहीर (Government Declared Holiday) केली आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्याप्रमाणे ही कामे होऊ शकणार नाहीत, राज्य सरकारने परक्राम्य संहिता अधिनियम (Negotiable Instrument Act,1881) कलम 25 नुसार ही सुट्टी जाहीर केली आहे. देशात दुखवटा असल्याने आणि गान कोकिळेच्या सन्मानार्थ ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी सिक्युरिटीज, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपी व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार किंवा सेटलमेंट 7 फेब्रुवारी रोजी होऊ शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची ((MPC) बैठक सोमवार,7 फेब्रुवारीपासून सुरू होणार होती, ती आता 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

राज्य सरकारने परक्राम्य संहिता अधिनियम (Negotiable Instrument Act,1881) कलम 25 नुसार ही सुट्टी जाहीर केली आहे.. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने अधिसूचना काढली असून. 7 फेब्रुवारी रोजी कोणकोणते कामकाज होणार नाही, याची माहिती जाहीर केली आहे. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, 7 फेब्रुवारी रोजी सरकारी सिक्युरिटीज, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपी व्याज दर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार किंवा सेटलमेंटला परवानगी दिली जाणार नाही. अधिसूचनेनुसार ही सर्व कामे दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

एमपीसीची बैठक 8 फेब्रुवासरी रोजी होईल रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची ((MPC) बैठक सोमवार, 8 फेब्रुवारी रोजी सुरू होणार होती, या घटनेमुळे आजपासून सुरु होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही बैठक चालणार आहे. अर्थसंकल्पानंतर लगेचच होणारी एमपीसीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लता दिदींच्या अचानक जाण्याने सोमवारी होणारी ही बैठक मंगळवारी सुरु होईल आणि गुरुवारपर्यंत चालेल. महाराष्ट्रात 7 फेब्रुवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट,1881 च्या कलम 25 अन्वये लता मंगेशकर यांचा सन्मान करत सुट्टी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या कलम 45झेडआय (4) अन्वये ही धोरण निश्चित करणा-या समितीची बैठक तहकूब करून उद्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड

अर्थसंकल्पानंतर रिझर्व्ह बँकेकडे नजरा, रिव्हर्स रेपोत रेटमध्ये बदलाचा तज्ज्ञांचा अंदाज

‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.