AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : परदेशात शिक्षणाचे स्वप्न महागणार! पैसे पाठविण्यावर लागणार टॅक्स

Income Tax : परदेशात शिक्षणाची हौस कोणाला नाही. जगातील अनेक टॉपच्या विद्यापीठात भारतीय विद्यार्थीच नाही तर शिक्षक पण आहेत. पण आता ही परदेशी भरारी सोपी राहणार नाही. तुम्हाला त्यासाठी अधिक कर द्यावा लागेल...

Income Tax : परदेशात शिक्षणाचे स्वप्न महागणार! पैसे पाठविण्यावर लागणार टॅक्स
| Updated on: May 21, 2023 | 12:16 PM
Share

नवी दिल्ली : परदेशी भरारी, वारीच नाही तर शिक्षण (Abroad Education) आणि विदेशात पैसा पाठविणे आता महाग होणार आहे. तुमच्या स्वप्नांनाना महागाईच पंख लागणार आहेत. भारतीय मुळातच बुद्धिवान आहे. त्यांना ज्ञान प्राप्त करण्याची लालसा आहे. त्यासाठी ते अनेक परदेशी विद्यापीठात (Foreign University) शिक्षण घेत आहेत. पण केंद्र सरकारने बदलविलेल्या धोरणामुळे परदेशातील शिक्षण महागणार आहे. त्यासाठी अधिक कराचा बोजा पडणार आहे.  तुम्ही म्हणाल सर्वसामान्यांना त्याच्याशी काय देणे-घेणे? पण परदेशी विद्यापीठाची फेलोशिप (Fellowship) मिळविणाऱ्या गरिब घरातील, मध्यमवर्गातील विद्यार्थ्यांना (Students) या नियमाची मोठी झळ बसणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. कशामुळे हा परिणाम होणार आहे, त्याची ही आहेत कारणे..

काय आहे TCS Rule Liberalised Remittance Scheme (LRS) अंतर्गत परदेशी चलन स्वीकारण्याची परवानगी आहे. पण या योजनेवर आता, अर्थसंकल्प 2023 मध्ये कर वाढविण्यात आला आहे. त्याला Tax Collected at Source-TCS असे म्हणतात. LRS च्या माध्यमातून कोणीही भारतीय नागरिक वैयक्तिकरित्या काही भांडवल, रक्कम भारताबाहेर पाठवू शकतो. त्यासाठी FEMA अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँक परवानगी देते. या कायद्यातंर्गत परदेशी बँकेत खाते उघडणे, रिअल इस्टेट वा इतर गुंतवणूक योजनेत पैसा गुंतवणे, परदेशातील प्रवास, इमिग्रेशन, उपचारासाठी जाण्याची परवानगी मिळते. सध्या LRS अंतर्गत प्रति व्यक्ति 2,50,000 डॉलरची मर्यादा आहे.

शिक्षण महागणार कर वाढविल्याने परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसेल. त्यांना पैसे पाठविणे महाग होईल. हा नियम 1 जुलै 2023 रोजीपासून लागू होईल. सरकारने परदेशातील टूर पॅकेजसाठी TCS चा दर 5% हून 20% करण्यात आले. 20% TCS त्या वस्तूंवर पण लागू होईल, ज्यांचा खर्च 7 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, अथवा व्यवहार या मर्यादेपक्षा जास्त असेल. हा नियम शिक्षण आणि मेडिकल, उपचार यांना वगळून परदेशी यात्रा, प्रवास, गुंतवणूक, परदेशात पैसे पाठविणे यासाठी लागू होईल.

असा होईल परिणाम समजा कल्पक नावाचा व्यक्ती 1 लाख रुपयांची आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज खरेदी करेल. तर त्याला टूर ऑपेरटरला 5000 रुपये TCS द्यावा लागेल. केंद्रीय अर्थसंकल्पात 2023 अंतर्गत आता ही रक्कम वाढून 20,000 रुपये इतकी झाली आहे.

इनकम टॅक्स फायलिंगमध्ये द्या माहिती जर एखादी व्यक्ती परदेशात जात असेल तर त्याने इनकम टॅक्स रिटर्नमध्ये पासपोर्ट क्रमांक द्यावा लागेल. तसेच एखादा व्यक्ती परदेशी यात्रेसाठी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करत असेल तर त्याला इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे. त्याला टूर ऑपरेटरकडून TCS सर्टिफिकेट (फॉर्म 27डी) घेणे आवश्यक आहे. तरच त्याला कलम 206C (1G) अंतर्गत दावा करता येईल.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.