India Post: आता पोस्टाद्वारेही मिळणार ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या सुविधा, करू शकाल ऑनलाइन खरेदी !

भारतीय पोस्टाच्या या नव्या सुरुवातीमुळे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सना एक मोठा धक्का बसू शकतो. भारतीय पोस्टाचे विश्वासार्ह आणि अतिशय मोठं नेटवर्क अनेक वर्षांपासून संपूर्ण भारतभर पसरलं आहे.

India Post: आता पोस्टाद्वारेही मिळणार ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या सुविधा, करू शकाल ऑनलाइन खरेदी !
ऑनलाईन शॉपिंग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 4:31 PM

जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करायला आवडत असेल तर ही तुमच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्रमाणेच आता तुम्ही इंडिया पोस्टच्या (India Post) माध्यमातूनही ही सुविधा मिळवू शकाल. कारण आता भारतीय पोस्टाने त्यांचे ई-कॉमर्स पोर्ट सुरू केले आहे. भारतीय पोस्टाच्या या नव्या सुरुवातीमुळे ॲमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipcart) यांसारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सना एक मोठा धक्का बसू शकतो. कारण भारतीय पोस्टाचे विश्वासार्ह आणि अतिशय मोठं नेटवर्क अनेक वर्षांपासून संपूर्ण भारतभर पसरलं आहे. या नव्या सुरुवातीमुळे पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी पोस्टात जावं लागणार नाही. कारण इंडिया पोस्टद्वारे आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्रमाणे होम डिलिव्हरी (Home Delivery) करण्यात येणार आहे. ज्याद्वारे ग्राहकांना घरबसल्या पोस्टाच्या सेवेचा लाभ घेता येईल.

भारतीय पोस्टाच्या या नव्या सुरुवातीमुळे आता सरळ लोकांच्या घरापर्यंत सामानाची डिलिव्हरी करता येईल. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईट प्रमाणेच भारतीय पोस्टही ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे ग्राहकांच्या घरापर्यंत सामान डिलीव्हर करणार आहे. तसेच सामान्य लोकांना अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतील. Amazon.In आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटही जिथे पोहोचू शकत नाही, त्या जागीही भारतीय पोस्टाची सेवा पोहोचू शकेल.

इंडिया पोस्टचे देशभरात मोठे जाळे असून, भारतातील प्रत्येक ग्रामीण भागात ते उपलब्ध आहे. याच कारणामुळे पोस्टाच्या ई-कॉमर्स वेबसाइट द्वारे खरेदी करण्यात आलेले सामान पोस्टमनकडून भारताच्या, ग्रामीण भागातील कोणत्याही कोप-यातील, कोणत्याही नागरिकापर्यंत पोहोचवले जाईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतातील पोस्ट ऑफिस हे प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहोचले असून त्यांची संख्या 1.55 लाखांहून अधिक आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणे इंडिया पोस्टही ग्राहकांना आणि दुकानदारांना त्यांच्यासोबत काम करण्याची आणि खरेदी करण्याची संधी देत आहे.

हे सुद्धा वाचा

इंडिया पोस्टच्या ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर अशा प्रकारे होईल –

  •  सर्वात आधी तुम्हाला पोस्टाच्या http://Ecom.Indiapost.Gov.In या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाईट वर जावं लागेल.
  •  त्यानंतर होम पेजवर तुम्हाला My Account या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  •  तिथे तुम्हाला पर्याय दिसतील Existing User आणि New User? Register Now – तेव्हा तुम्हाला पाहिजे तो पर्याय निवडा आणि नोंदणी पूर्ण करावी लागेल.
  •  नोंदणीसाठी तुमचा पत्ता, पिन कोड, राज्य, मोबाईल नंबर, ईमेल आयडी याची माहिती द्यावी लागेल.
  •  त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती सेव्ह करावी लागेल आणि नवा यूजर आयडी व पासवर्ड मिळेल.

भारतीय पोस्टाच्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून कोणत्या गोष्टी खरेदी करू शकाल ?

  1.  कपडे
  2. भारतीय पोस्टाची उत्पादने
  3. बांगड्या
  4.  गिफ्ट्स
  5. होम अप्लायन्सेस
  6.  बास्केट

टपाल विभाग सध्या पुरवत आहे या सेवा –

1) स्पीड पोस्ट 2) पोस्टल लाइफ इन्शुरन्स 3) लॉजिस्टिक पोस्ट 4) रिटेल पोस्ट 5) बिझनेस पार्सल 6) पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम 7) इलेक्ट्रॉनिक मनी 8) सुकन्या समृद्धी योजना 9) बिझनेस पोस्ट पार्सल 10) आय एम ओ 11) रुरल पोस्ट लाइफ इन्शुरन्स 12) एक्प्रेस पार्सल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.