Omicron Effect: हा आठवडा शेअर बाजारासाठी कसा असणार? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

| Updated on: Nov 29, 2021 | 6:15 AM

गेला आठवडा शेअरबाजारासाठी  ( Stock market) प्रतिकूल राहिला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड पहायला मिळाली होती. दरम्यान याही आठवड्यात शेअरबाजारात मंदीचे संकेत मिळत आहेत.

Omicron Effect: हा आठवडा शेअर बाजारासाठी कसा असणार? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
शेअर बाजार
Follow us on

मुंबई : गेला आठवडा शेअरबाजारासाठी  ( Stock market) प्रतिकूल राहिला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड पहायला मिळाली होती. त्यानंतर गुरुवारचा अपवाद वगळता सेन्सेक्स (Sensex) मधील घसरण कायम राहिली. कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जगभरात पुन्हा भितीच वातावरण पसरलं आहे. अशात अनेक देशांतील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. शेअरबाजारातील गुंतवणूकदांना मोठा फटका बसलाय. काही काळातच गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान झालं आहे. काही देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. आणि त्याचाच फटका जगभरातील शेअर बाजाराला बसत आहे. याही आठवड्यात शेअरबाजारातील मंदी कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

काही देशात पुन्हा लॉकडाऊनची भिती

गेल्या दोन वर्षात कोरोनानं जगभरात थैमान माजवलं आहे. कित्येक देशांनी आतापर्यंत अनेकदा लॉकडाऊन केलं आणि आता पुन्हा नवा व्हेरिएंट आढळल्यानं पुन्हा लॉकडाऊनची भिती निर्माण झाली आहे. त्याचा उद्योगधंद्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात याचा मोठा फटका बसत आहे. लॉकडाऊनच्या भीतीने ग्राहक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी करत असल्याने याचा दबाव हा शेअर मार्केटवर निर्माण झाला आहे. त्यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

हा आठवडाही पडझडीचा

दरम्यान चालू आठवड्यात शेअर बाजाराची स्थिती कशी राहणार याबाबत बोलतान तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन (Omicron)ची स्थिती कशी असे यावर शेअर बाजाराचे भविष्य अवलंबून असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून या आधीच हा विषाणू  खतरनाक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेअर बाजारात मंदीच राहण्याची दाट शक्यता आहे.

गुंतवणूकदार काय निर्णय घेणार?

याबाबत बोलताना स्वस्तिक इन्वेस्टमार्टचे प्रमुख संतोष मीणा यांनी म्हटले आहे की, सध्या शेअर बाजारावर परिणाम करणारा ओमिक्रॉन हा एक प्रमुख घटक आहेच, याशिवाय विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत काय निर्णय घेतात यावर देखील येणाऱ्या काळात शेअर बाजाराचे भवितव्य अवलंबून असेल.

संबंधित बातम्या 

स्टार्ट अपमध्ये जगाचे नेतृत्व भारताच्या हातात; 70 पेक्षा अधिक स्टार्ट अपने ओलांडला एक अब्ज डॉलरचा टप्पा – मोदी

पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते

कच्च्या तेलाचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर