AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते अपघातातील पिडीतेला एक कोटीची नुकसान भरपाई, या कोर्टाने दिला आदेश

याचिकाकर्त्या या शाळकरी विद्यार्थीनी असताना त्या शाळेतून घरी जात असताना एका वाहनाने ठोकरल्याने त्यांच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे लुळा झाला होता.

रस्ते अपघातातील पिडीतेला एक कोटीची नुकसान भरपाई, या कोर्टाने दिला आदेश
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना सश्रम कारावासImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 18, 2023 | 3:57 PM
Share

नवी दिल्ली : एका रस्ते अपघात प्रकरणात कायम अपंगत्व आलेल्या एका तरुणीला 1 कोटी 12 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 14 वर्षांपूर्वी याचिकाकर्त्या महिलेला एका वाहनाने ठोकरल्याने तिच्या कमरेखालील भागातील संवेदना नष्ट होऊन तिला कायमस्वरूपी अपंगत्व येत व्हीलचेअरवर बसावे लागले आहे. ही महिला अपघात झाला तेव्हा  केवळ अकरा वर्षांची होती. महिलेने मोटार अपघात दावा प्राधिरणाच्या याआधीच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाच आव्हान दिले होते.

दिल्ली हायकोर्टात या महिलेच्या वतीने बोलताना तिच्या वकीलांनी बाजू मांडताना सांगितले की अपघातानंतर तिच्या कमरेखालचा भाग लुळा झाला असून तिला आता आयुष्यभर दुसऱ्यावर विसंबून रहावे लागणार आहे. याचिकेत दिल्लीच्या मोटार अपघात लवादाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणात कोणत्याही मुद्दावर नीट विचार केला नव्हता असा आरोप करण्यात आला होता. रस्ते अपघातानंतर कोणत्याही मानवी दृष्टीकोनातून विचार न करता केवळ 47 हजाराची नुकसान भरपाई दिली होती. हायकोर्टाने सर्व बाजूचा विचार करून आता नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करीत ती 1 कोटी 12 लाख इतकी केली आहे.

हायकोर्टात आवाहन केले

याचिकाकर्त्या ज्योती सिंह या शाळकरी विद्यार्थीनी असताना त्या शाळेतून घरी जात असताना एका वाहनाने ठोकरल्याने त्यांच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे लुळा झाला होता. त्यावेळी याचिकाकर्त्या या केवळ अकरा वर्षांच्या होत्या. त्यांनी साल 2008 मध्ये मोटार अपघात दावा लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी मोटार लवादाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आवाहन केले होते. त्यावर न्या.नाझमी वजिरी यांनी निकाल देत याचिका कर्त्याला 1 कोटी 12 लाख रूपयांची नुकसान भरपाई करण्याचा निकाल दिला आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....