AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील लोकं Petrol भरण्यासाठी थेट गुजरातमध्ये! दर 100च्या आत, पेट्रोलसाठी नंदुरबारमधील वाहनांच्या रांगा

Petrol Diesel Rates Today : महाराष्ट्रातील कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांत पेट्रोलचे दर हे जवळपास 111 रुपयांच्या आसपास आहेत. तर डिझेलचे दरही लवकरच शंभरीपार जातील की काय अशी भीती महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागली आहे.

महाराष्ट्रातील लोकं Petrol भरण्यासाठी थेट गुजरातमध्ये! दर 100च्या आत, पेट्रोलसाठी नंदुरबारमधील वाहनांच्या रांगा
सीमेलगतच्या भागातील लोक पेट्रोल भरण्यासाठी थेट गुजरातमध्ये Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 1:50 PM
Share

नंदुरबार : पाच राज्यांच्या निवडणुका (5 State assembly Elections 2022) संपूर्ण आता या राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, हेही स्पष्ट झालं आहे. निवडणुकांच्या काळापासून काही प्रमाणात स्थिरावलेले पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) आता पुन्हा एकदा भडकू लागले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं डोकं वर काढलं आहे. उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपुरातील निवडणुकांची रणधुमाळी आता थंडावते आहे. पण दुसरीकडे संपूर्ण देशभरातच पुन्हा इंधनाच्या दैनंदिन दरांमध्ये चढता आलेत, पाहायला मिळू लागलेय. अशातच गुजरातमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलचे दर हे शंभरीच्या आत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सीमेवरील लोकं पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी चक्क गुजरातमधील पेट्रोल-पंपावर जात असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील अनेक वाहनं ही स्वस्त दरातील पेट्रोल खरेदी करता यावं, म्हणून गुजरात (Gujrat) राज्याला पसंती देत आहेत. यामुळे नंदुरबारच्या सीमेवरील महाराष्ट्राच्या हद्दीत असलेले पेट्रोल पंप हे ओस पडलेत.

गुजरातमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे तिथे नेमके इंधनाचे दर किती दिवस स्थिर राहतात, याकडे संपूर्ण देशाची नजर लागली आहे. एकूण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनांच्या दरांचा मतांवरही परिणाम होण्याची शक्यताही असते. त्यामुळे इंधनाचे दर आवाक्यात ठेवणं, हे सरकारसमोरचंही मोठं आव्हान असणार आहे.

नेमके काय आहेत दर..?

नंदुरबार जिल्ह्यात 110.91 रुपये पेट्रोलचे दर आहेत. तर डिझेलचा दर 94 रुपये 69 पैसे आहे. नंदूरबार जिल्हापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 96 रुपये 99 पैसे तर डिझेल 89 रुपये दरानं विकलं जातंय. त्यामुळे नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक नागरिक गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जात आहेत.

गुजरात मधील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी वाहन धारकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळतायत. तर गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील महाराष्ट्र राज्यामधील पेट्रोल पंप ओस पडलेत.

शहरांमध्ये दरवाढीची चिंता

महाराष्ट्रातील कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांत पेट्रोलचे दर हे जवळपास 111 रुपयांच्या आसपास आहेत. तर डिझेलचे दरही लवकरच शंभरीपार जातील की काय अशी भीती महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापुरात डिझेलचे दर हे 94 ते 95 रुपयांच्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत पेट्रोलची झालेली दरवाढ ही अनेक गोष्टींवर परिणाम करते. त्यामुळे भाज्य, फळ, धान्य यांचेही दर वाढण्याची दाट शक्यता आहे. अशात नंदुरबारसह गुजरातच्या सीमेलगतच्या भागातील राज्यातील जनता गुजरातमध्ये स्वस्त पेट्रोल खरेदीसाठी पसंती देत असल्याचं बघायला मिळतंय.

संबंधित बातम्या :

‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

निर्यातीसाठी ठरवलेलं टार्गेट भारत सरकारनं 9 दिवस आधीच पूर्ण केलं! 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यात यश

एफडीमध्ये गुंतवणूक करायचीये? या दहा बँकांबद्दल जाणून घ्या ज्या देतात सर्वोत्तम व्याज

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.