AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Petrol and Diesel price | यापूर्वी रविवारी डिझेलच्या प्रतिलीटर दरात 25 ते 27 पैशांची वाढ झाली होती. शुक्रवारीही डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली होती. सध्या मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.26 रुपये आणि प्रतिलीटर डिझेलसाठी 96.93 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 89.32 रुपये इतका आहे.

Petrol-Diesel Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ
पेट्रोल-डिझेल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 27, 2021 | 7:47 AM
Share

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत असल्याने आता भारतातही त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. परिणामी देशातील इंधनाचे दर पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. डिझेलच्या दरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली. डिझेलच्या प्रतिलीटर दरात 25 पैशांची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. डिझेलची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास डिझेलही लवकरच शंभरीपार पोहोचेल. (Petrol and Diesel price)

यापूर्वी रविवारी डिझेलच्या प्रतिलीटर दरात 25 ते 27 पैशांची वाढ झाली होती. शुक्रवारीही डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली होती. सध्या मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.26 रुपये आणि प्रतिलीटर डिझेलसाठी 96.93 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 89.32 रुपये इतका आहे.

मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी पुन्हा उलटा प्रवास सुरु केल्याने मोठ्या इंधन दरवाढीचे संकेत मिळू लागले आहेत.

गेल्या चार दिवसांत डिझेल 70 पैशांनी महागले

गेल्या चार दिवसांमध्ये डिझेलचे दर तीनवेळा वाढले आहेत. त्यामुळे डिझेल 70 पैशांनी महागले आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 24 सप्टेंबरला डिझेलच्या दरात 20 पैसे, 26 सप्टेंबरला 25 पैसे आणि आज 25 पैशांची वाढ केली होती. तुर्तास पेट्रोलची किंमत स्थिर आहे.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

(Petrol and Diesel price)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...