पेट्रोल भरा किंवा नका भरू; पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या ‘या’ मोफत सुविधांचा तुम्ही घेऊ शकता लाभ

पेट्रोल भरा किंवा नका भरू; पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा तुम्ही घेऊ शकता लाभ
Image Credit source: TV9 Marathi

पेट्रोल पंपचालकांना काही सुविधा मोफत देणे बंधनकारक करण्यात आले आहेत. या सर्व सुविधांचा लाभ तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल न भरता देखील घेऊ शकतात.

अजय देशपांडे

|

May 22, 2022 | 8:41 AM

पेट्रोल पंपावर अशा काही सुविधा (Petrol Pump facilities) असतात ज्या पूर्णपणे मोफत असतात. तुम्ही संबंधित पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले नाही तर देखील तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना या सुविधा मोफत देणे (Petrol pump FREE services) बंधनकारक असते. जर समजा तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपावर (Petrol pump) गेला आहात आणि तुम्हाला पेट्रोल भरायचे नाही. मात्र पेट्रोल पंपावर असलेल्या मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही तो घेऊ शकता. जर संबंधित पेट्रोल पंपावर या सुविध नसतील किंवा तुम्हाला त्या मोफत देण्यास नकार देण्यात आला तर तुम्ही संबंधित पेट्रोल पंप मालकाविरोधात तक्रार दाखल करू शकता. या सुविधा मोफत देण्यात येत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकावर मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइनचे उल्लंघ केल्याप्रकरणात करावाई होऊ शकते. या सुविध नेमक्या कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा

  1. मोफत हवा : प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनाच्या टायरमध्ये हवा भरण्याचे मशीन ठेवणे बंधकारक आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जी वाहने येतात त्यातील एखाद्या वाहनाच्या चाकांमध्ये हवा कमी असेल तर तिथे हवा भरली जाते. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही पेट्रोल भरले नाही तर देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी पेट्रोल पंपचालकांकडून कोणतेही पैसे आकारले जात नाहीत.
  2. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था : प्रत्येक पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक असते. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीने पाणी मागितल्यास त्याला ते उपलब्ध करून द्यावे लागते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
  3. शौचालय : जिथे पेट्रोल पंप असेल तिथे मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइननुसार शौचालय बांधने आवश्यक आहे. जर एखाद्या पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा नसेल तर तुम्ही संबंधित पेट्रोल पंप मालकाची तक्रार करू शकता.
  4. फोनची सुविधा : पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकाला जर एखाद्या व्यक्तीला एमरजन्सी फोन करायचा असेल तर त्याला मोफत फोनची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
  5. प्राथमिक उपचार किट : या सर्व सुविधांसोबतच प्रत्येक पेट्रोल पंपावर प्राथमिक उपचार किट ठेवणे देखील बंधनकारक आहे. ज्यामुळे एमरजन्सीमध्ये एखाद्या जखमी व्यक्तीवर प्राथमीक उपाचर केले जावू शकतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें