1 ऑक्टोबरपासून पोस्टातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित ‘या’ सहा गोष्टी बदलणार

Post office | तुम्ही पोस्टाचे एटीएम हरवले किंवा ते गहाळ झाले तर नवीन कार्डासाठी 1 ऑक्टोबरपासून 300 रुपये भरावे लागतील. एटीएम पिन क्रमांक हरवला तर 1 ऑक्टोबरपासून डुप्लिकेट पिनसाठी शुल्क भरावे लागेल. पिन पुन्हा व्युत्पन्न करण्यासाठी किंवा शाखेद्वारे डुप्लिकेट पिन मिळवण्यासाठी 50 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क आकारले जाईल.

1 ऑक्टोबरपासून पोस्टातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित 'या' सहा गोष्टी बदलणार
पोस्ट ऑफिस
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 7:06 AM

मुंबई: आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी सरकार आणि बँकांकडून सातत्याने नियमांमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात अगदी दर महिन्याला आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या नियमांत बदल होत असतो. येत्या 1 ऑक्टोबरपासून आर्थिक व्यवहारांबाबत असेच काही बदल होऊ घातले आहेत. (Transaction related changes in Post office)

* 1 ऑक्टोबरपासून एटीएम/डेबिट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी असेल. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2021 आणि 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी लागू असतील. याशिवाय, पोस्टाकडून आता आपल्या डेबिट कार्डधारक ग्राहकांकडून एसएमएस अलर्टसाठी 12 रुपये (जीएसटीसह) आकारले जातील. हे शुल्क डेबिट कार्डधारकांना पाठविलेल्या एसएमएस अलर्टसाठी वार्षिक शुल्क असेल.

* तुम्ही पोस्टाचे एटीएम हरवले किंवा ते गहाळ झाले तर नवीन कार्डासाठी 1 ऑक्टोबरपासून 300 रुपये भरावे लागतील. एटीएम पिन क्रमांक हरवला तर 1 ऑक्टोबरपासून डुप्लिकेट पिनसाठी शुल्क भरावे लागेल. पिन पुन्हा व्युत्पन्न करण्यासाठी किंवा शाखेद्वारे डुप्लिकेट पिन मिळवण्यासाठी 50 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क आकारले जाईल.

* बचत खात्यात शिल्लक नसल्यामुळे एटीएम किंवा पीओएस व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकाला 20 रुपये अधिक जीएसटी असा दंड भरावा लागेल.

* पोस्ट विभागाने एटीएममध्ये करता येणाऱ्या मोफत आर्थिक व्यवहारांची संख्याही मर्यादित केली आहे. पोस्टाच्या एटीएममध्ये पाच मोफत व्यवहार केल्यानंतर आर्थिक व्यवहारांवर 10 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल. इतर एटीएममध्ये आर्थिक व्यवहार, मेट्रो शहरांमध्ये तीन मोफत व्यवहार किंवा नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहार झाल्यानंतर 20 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल.

* पोस्टाच्या स्वतःच्या एटीएममध्ये बिगर आर्थिक व्यवहारासाठी, ग्राहकाला पाच मोफत व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 5 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क द्यावे लागेल. इतर बँकांच्या एटीएमच्या बाबतीत, मेट्रो शहरांमध्ये तीन मोफत व्यवहार किंवा नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहारानंतर, व्यक्तीला 8 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल.

* डेबिट कार्डधारकांना पॉईंट ऑफ सर्व्हिस (पीओएस) वर रोख रकमेच्या व्यवहाराच्या 1% रक्कम भरावी लागेल. प्रत्येक व्यवहारात जास्तीत जास्त 5 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.

संबंधित बातम्या:

फक्त तीन दिवस उरले, मोदी सरकार नियम बदलणार?; नोकरदारांना 12 तास काम, 15 मिनिटांचाही ओव्हरटाईम

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

तुमच्या जुन्या एलपीजी सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, एवढे मोजावे लागतील पैसे

(Transaction related changes in Post office)

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.