AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंत व्हायचेय ? मग राकेश झुनझुनवाला यांच्या या टिप्स वाचाच

झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात अल्प गुंतवणुकीपासून सुरुवात केली आणि शेअर बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांच्या यादीत प्रवेश केला. शेअर बाजारातून त्यांनी हजारो कोटींची कमाई केली.

श्रीमंत व्हायचेय ? मग राकेश झुनझुनवाला यांच्या या टिप्स वाचाच
राकेश झुनझुनवालाImage Credit source: Social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Nov 21, 2022 | 7:49 PM
Share

मुंबई : राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर बाजारात वर्चस्व असणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात अल्प गुंतवणुकीपासून सुरुवात केली आणि शेअर बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांच्या यादीत प्रवेश केला. शेअर बाजारातून त्यांनी हजारो कोटींची कमाई केली. अखेरच्या श्वासापर्यंत शेअर बाजाराशी जोडलेल्या झुनझुनवाला यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेअर बाजाराला समर्पित केले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील अनेक टिप्स गुंतवणूकदारांना सांगितल्या आहेत.

राकेश झुनझुनवाला यांनी कोणत्या टिप्स दिल्या?

तोटा सहन करायला शिका

तुम्ही तोटा सहन करु शकत नसाल तर तुम्ही शेअर बाजारात नफा मिळवू शकत नाही. प्रत्येक गुंतवणुकीवर नफा मिळवणे अशक्य आहे. बाजारात व्यवहार करताना काही चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. कोणत्याही कारणातून नुकसान होऊ शकते, मात्र ते पचवण्याची ताकद ठेवा.

फंडामेंटल आणि व्यवस्थापन पाहून गुंतवणूक करा

कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या मूलभूत गोष्टी जरुर पहा. याशिवाय कंपनीच्या व्यवस्थापनाकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. या दोन्ही गोष्टींची शहानिशा करुनच गुंतवणूक करायची की नाही,हे ठरवा.

भावनिक होऊ नका

जर तुम्ही भावनिक होऊन शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. भावनिक गुंतवणूक नुकसानास आमंत्रण देऊ शकते. यामुळे तुमच्या भावना बाजूला ठेवून गुंतवणूक करा. अपयशाकडे लक्ष देणे किंवा बाजारातील घडामोडी वैयक्तिक पातळीवर तुम्हाला गुंतवणूकदार म्हणून मदत करणार नाही.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला