AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सरकारी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि दोन लाखांचा अपघाती विमा मिळवा; जाणून घ्या योजनेचा तपशील

या योजनेत वर्षभरात अपघाती मृत्यू म्हणजेच अपघातात मृत्यू आणि अपघातात अपंगत्व आल्यास भरपाई देण्याची तरतूद आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. या योजनेमध्ये तीन प्रकारचे फायदे उपलब्ध आहेत. पहिला फायदा अपघाती मृत्यूशी संबंधित आहे.

या सरकारी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि दोन लाखांचा अपघाती विमा मिळवा; जाणून घ्या योजनेचा तपशील
या सरकारी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि दोन लाखांचा अपघाती विमा मिळवा
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 7:53 AM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारने अलिकडेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल e-SHRAM portal सुरू केले होते. या पोर्टलवर अवघ्या चार आठवड्यांत 1 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे. जो कोणी या पोर्टलवर नोंदणी करतो, त्याला 2 लाखांचा अपघाती विम्याचा लाभ मोफत मिळतो. अपघाती विम्याचा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत (PMSBY) उपलब्ध आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यावर, पहिल्या वर्षासाठी अपघाती विम्याचा प्रीमियम कामगार मंत्रालयाने जमा केला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) ही सरकारी अपघात विमा पॉलिसी ( Personal Accident Insurance Scheme) आहे. (Register on this government portal and get accident insurance of Rs two lakh; know the details of the plan)

या योजनेत वर्षभरात अपघाती मृत्यू म्हणजेच अपघातात मृत्यू आणि अपघातात अपंगत्व आल्यास भरपाई देण्याची तरतूद आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. या योजनेमध्ये तीन प्रकारचे फायदे उपलब्ध आहेत. पहिला फायदा अपघाती मृत्यूशी संबंधित आहे. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनी म्हणून नेमलेल्या व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. जर कोणी अपघातात दोन्ही हात, पाय किंवा डोळे गमावले, तरीही त्याला 2 लाखांचा लाभ मिळेल. जर विमाधारकाला अपघातात एका डोळ्याची दृष्टी गमावावी लागली किंवा एका पायात किंवा हातात अपंगत्व आले तर त्या व्यक्तीला 1 लाखाचा विमा लाभ मिळेल.

12 रुपयांचा वार्षिक प्रीमियम

या योजनेचा विमा हप्ता फक्त 12 रुपये आहे. ही योजना दरवर्षी स्वयं नूतनीकरण होते किंवा तिचे नूतनीकरण करावे लागते. या योजनेसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 70 वर्षे आहे. जर कोणाकडे अनेक बँक खाती असतील तर तो कोणत्याही एका बँकेच्या एका खात्यातून या योजनेचा लाभ घेता येईल.

देशभरात 38 कोटी कामगार

वेगवेगळ्या सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात असंघटित क्षेत्रात सुमारे 38 कोटी कामगार आहेत. सर्व कामगारांना या योजनेच्या कक्षात आणणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारला या मजुरांचा योग्य डेटाबेस स्वत:कडे ठेवायचा आहे. या पोर्टलवर नोंदणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. त्याची नोंदणी कोणत्याही सामान्य सेवा केंद्रात करता येते. याशिवाय राज्य सरकारच्या क्षेत्रीय कार्यालयातही नोंदणी करता येते.

कोणीही नोंदणी करू शकतो

असंघटित क्षेत्रातील कोणताही कामगार या पोर्टलवर नोंदणी करू शकतो. उत्पन्नाच्या आधारावर कोणतेही निकष निश्चित केलेले नाहीत. तथापि, नोंदणीकृत कामगार आयकर भरणारा नसावा.

या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करा

या पोर्टलवर कोणाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला eshram.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. येथे बँक खात्याच्या तपशीलांसह सर्व माहिती शेअर केली जाते. सरकारचा हेतू असा आहे की या पोर्टलवर नोंदणी केलेली असेल तर संबंधित कामगाराला सरकार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) वेळेवर लाभ देऊ शकते. (Register on this government portal and get accident insurance of Rs two lakh; know the details of the plan)

इतर बातम्या

महामार्गाच्या कामावरून पुन्हा पत्रप्रपंच; आता नितीन गडकरींना पंकजा मुंडे लिहिणार पत्र

आरोग्य विभागातल्या भरतीसाठी दलालांच्या मागे आहात? आरोग्य मंत्री टोपे काय म्हणतात, ते लक्षात ठेवा

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.